पोदार इंटरनॅशनल स्कुलमधे आगीवर नियंत्रणाचे मॉकड्रील

jain-advt

जळगाव : येथील पोदार इंटरनॅशनल स्कुलमधे आगीवर नियंत्रण कसे मिळवायचे याबाबतीत मॉकड्रील घेण्यात आले. शाळेत आग लागली असता आपण परिस्थिती कशी हाताळायची याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. आपात्कालीन अग्नीशमन विभागाला तात्काळ संपर्क साधून माहिती देण्याबाबत देखील विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

आगीच्या घटनेत एखादा विद्यार्थी जखमी अथवा बेशुद्ध झाल्यास त्याच्यावर प्राथमिक वैद्यकीय उपचार कशा पद्धतीने करायचे?, फायर एश्टींग्युशरने आगीवर कसे नियंत्रण मिळवायचे? एलपीजी गॅसला आग लागल्यास काय करायचे या सर्व बाबतीत विद्यार्थ्यांना मनपा अग्नीशमन विभागाच्या वतीने मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक करुन दाखवण्यात आले. यावेळी पोदार स्कुलचे प्राचार्य महाजन, जितेंद्र कापरे व इतर शिक्षकवृंद उपस्थित होते. अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, सहायक अग्निशमन अधिकारी सुनिल मोरे, फायरमन अश्वजित घरडे, भारत बारी, तेजस जोशी, नितीन बारी यांचे यावेळी सहकार्य मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here