पोदार इंटरनॅशनल स्कुलमधे आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात

jain-advt

जळगाव : पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. पोदार इंटरनॅशनल स्कुलच्या समन्वयिका सौ. मेघना राजकोटिया यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना तसेच उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा यावेळी परिचय करुन दिला. सूत्रसंचालन कु. हिमांशू पाटील, कु. अथर्व पाठक, कु. अदिती वाघ व कु प्रांजली पाटील या विद्यार्थ्यांनी केले होते.

उपप्राचार्य दिपक भावसार व पोदार जम्बो किड्सच्या मुख्याध्यापिका सौ. उमा वाघ यांनी प्रमुख पाहुणे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके व योग प्रशिक्षिका सौ. निशिता रंगलानी यांचे पोदार स्कूलच्या वतीने पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते योग महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले. शाळेच्या योग शिक्षिका कु स्रेह कुळकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थ्यानी सूर्यनमस्कार व योगासने केली. या प्रसंगी पोदार जंबो किड्सच्या मुख्याध्यापिका सौ. उमा वाघ, वरिष्ठ समन्वयक हिरालाल गोराणे, प्रशासकीय अधिकारी जितेंद्र कापडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here