शिवसेना आ. नितीन देशमुख बेपत्ता – पत्नीची पोलिसात तक्रार

jain-advt

अकोला : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेलेले बाळापूर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घ्यावा अशी तक्रार आणि मागणी त्यांची पत्नी प्रांजली देशमुख यांनी सिव्हील लाईन्स पोलिस स्टेशनला केली आहे.

प्रांजली देशमुख यांच्या तक्रारीनंतर सिव्हिल लाइन पोलिसांचे एक पथक सुरतच्या दिशेने रवाना झाले आहे. सिव्हील लाइन पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. कांबळे आणि इतर चार पोलिस कर्मचा-यांचा या पथकात समावेश आहे. या पथकासमवेत प्रांजली देशमुख या देखील गेल्या असून पतीला भेटण्यासाठी आपल्याला कुणी रोखू शकत नाही असे सौ. देशमुख यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here