पोलिस निरिक्षकावर पोलिस स्टेशनमधेच चाकूहल्ला

jain-advt

औरंगाबाद : जिन्सी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व्यकटेश केंद्रे (55) यांच्यावर रात्री पोलिस नाईक मुजाहेद शेख याने चाकू हल्ला केल्याची घटना घडली. पोटात व छातीत दोन वेळा आणि तिसरा वार तळहातावर झाला असून त्यांच्यावर औरंगाबाद शहारातील अ‍ॅपेक्स हॉस्पीटलमधे उपचार सुरु आहेत. रात्री उशीरापर्यंत त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरुच होती.

घटना घडली त्यावेळी पोलिस निरीक्षक व्यकटेश केंद्र हे सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळांकडून सत्कार स्विकारत होते.शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सत्काराचा कार्यक्रम अर्धवट सोडून पो.नि. केंद्रे त्याला समजावण्यासाठी गेले. त्यावेळी सदर घटना घडली. पो.नि. व्यकटेश केंद्रे यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here