पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांची तब्येत अद्याप चिंताजनक

jain-advt

औरंगाबाद : प्राणघातक चाकू हल्ल्यात जखमी झालेले जिन्सी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व्यकटेश केंद्रे यांची तब्येत बुधवारी रात्रीपर्यंत चिंताजनक होती असे वैद्यकीय सुत्रांनी म्हटले आहे.

स्वेच्छा निवृत्तीचा मंजूर झालेला अर्ज रद्द करण्याचा वाद घालत पोलिस कर्मचारी शेख मुजाहेद शेख उस्मान याने मंगळवारी दुपारच्या वेळी पो.नि. केंद्रे यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेत केंद्रे यांच्या पोटात दोन तर हातावर एक वार करण्यात आला. दोन्ही जखमा केंद्रे यांच्या पाठीच्या दिशेने खोल गेल्या असून यकृताच्या मुख्य रक्तवाहिनीला जखम झाली आहे. तब्येतील सुधारणा झाल्यास एक शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. मात्र त्यासाठी तब्येतीत सुधारणा होणे गरजेचे आहे. या घटनेप्रकरणी स.पो.नि. अनिल मगरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेख मुजाहेद शेख उस्मान याच्याविरुद्ध भा.द.वि. 307, 353, 332 व 294 या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पो.नि. व्यकंटेश केंद्रें यांच्यावर हल्ला करताना मुजाहेद याच्या हाताला चाकू लागल्याने जखम झाली. त्यावेळी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाने एएसआय नाजी रखान पठाण यांनी त्याला घाटी रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यावेळी त्याने एएसआय पठाण यांना देखील शिवीगाळ करत कॉलर पकडून मारहाण केली. तु पीआय का आदमी है, तेरा भी मर्डर करता अशी धमकी दिली. त्यामुळे या घटनेप्रकरणी बेगमपुरा पोलिस स्टेशनला मुजाहेद विरुद्ध भा.द.वि. 332, 353 नुसार अजून एक वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुजाहेद याने यापुर्वी डीएसबीचे पो.नि. सोपान बोरसे यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याला निलंबीत करण्यात आले होते. मुजाहेद सध्या पोलिस कोठडीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here