वडीलोपार्जीत जागा रिकामी करण्यासाठी जादूटोण्याचा प्रकार?

जळगाव : प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला अ‍ॅड. केदार भुसारी यांच्या शिवाजी नगर दालफड येथील घराच्या दाराजवळ मानवी केस व हळद कुंकू, “अंजली” असे लिहिलेली, पिवळ्या रंगाची फुली करुन ठिकठिकाणी सुया टोचलेली काळी बाहुली टाकण्याचा प्रकार कुणीतरी करत आहे. याप्रकरणी सौ. अंजली केदार भुसारी यांनी जळगाव शहर पोलिस स्टेशनला सहा संशयितंविरुद्ध अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

सौ. अंजली भुसारी यांचे पती अ‍ॅड. केदार भुसारी यांच्या बाजूने वडिलोपार्जीत जागेच्या दाव्याचा निकाल लागला आहे. सदर दावा सौ. अंजली भुसारी यांच्या सास-यांनी केला होता. आपल्याला घाबरवण्यासाठी व आपल्या पतीच्या जीवाचे बरेवाईट होण्याच्या उद्देशाने सहा जणांकडून हा प्रकार केला जात असल्याचा संशय सौ. अंजली भुसारी यांनी फिर्यादीच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. प्रकाश रामेश्वर व्यास व त्यांची पत्नी, ललिता प्रकाश व्यास, सुशिला गोपाळ पंडीत, विद्या गोपाळ पुरोहीत, गौरीलाल रुपचंद पुरोहीत सर्व रा. शिवाजीनगर दाळफड जळगाव अशी संशयीतांची नावे आहेत. स.पो.नि. संदीप परदेशी पुढील तपास करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here