अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-यास वीस वर्ष शिक्षा 

नाशिक :  अल्पवयीन मुलीला मोबाइल दाखवण्याचा बहाणा करत तिच्यावर अत्याचार  करणाऱ्या आरोपीला विस वर्ष सक्तमजुरीची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे. कुणाल ऊर्फ कान्हा मगन जाधव (22) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

4 मार्च 2020 रोजी दुपारी दोन वाजता म्हसरुळ-मखमलाबाद लिंक रस्त्यावर हा प्रकार घडला होता. पीडित मुलीला उलट्या होत असल्याने तिच्या आईने तिची वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी पिडीता चार महिन्यांची गरोदर असल्याचे लक्षात आले. पिडीतेने कथन केलेल्या माहितीनुसार सर्व प्रकार उघड झाला. मोबाईल दाखवण्याच्या बहाण्याने आरोपी कुणाल उर्फ कान्हा मगन जाधव याने पिडीतेवर अत्याचार तसेच तिच्या आई वडीलांना जीवे ठार करण्याची धमकी दिल्याचे उघड झाले. कुणाल जाधव याच्याविरुद्ध म्हसरुळ पोलिस स्टेशनला बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण ‘पोक्सो’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सबळ पुराव्याच्या आधारे त्याला शिक्षा सुनावण्यात आली.  सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. दीपशिखा भिडे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. या खटल्यात पिडीता फितुर झाली मात्र तरी देखील न्यायालयाने गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेत आरोपीस शिक्षा सुनावली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here