रिक्षाचालक ते मुख्यमंत्री व्हाया बांधकाम व्यावसायिक; एकनाथ शिंदेची वाटचाल यशस्वी झाली दिवसागणीक!!

शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याची सर्वांना खात्री असतांना प्रत्यक्षात एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. रिक्षा चालक म्हणून आपल्या जीवनाची कारकिर्द सुरु करत एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जन्म 1964 साली सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात झाला. इयत्ता अकरावीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. रिक्षाचालक असतानांच सन 1980 च्या कालावधीत त्यांनी हिंदुह्रदयसम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने शिवसेनेत प्रवेश केला. तेथून त्यांची राजकीय वाटचाल सुरु झाली.

सन 1997 साली ते ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. सन 2001 मधे ते विरोधी पक्षनेते होते. सन 2002 मधील दुसऱ्यांदा नगरसेवक झाल्यानंतर तिन वर्ष त्यांनी स्थायी समितीचे सदस्यपद सांभाळले. ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून त्यांनी चारवेळ आमदारकी मिळवली. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात असतांना एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते होते.

गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दाखल केलेल्या प्रत्रिज्ञापत्रात त्यांच्याकडे 11 कोटी 56 लाखापेक्षा अधिक संपत्ती आहे. यातील 9.45 कोटी ही स्थिर आणि 2.10 कोटी अस्थिर संपत्ती आहे. सामान्य शिवसैनिक असतांना त्यांनी शिवसेनेसाठी अनेकवेळा आंदोलनात सहभाग घेतला. त्यांच्यावर अठरा गुन्हे दाखल आहेत. प्रतिज्ञापत्रात शिंदे यांनी आपला बांधकाम व्यवसाय असल्याचे म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे सात गाड्या असून त्याची एकूण किंमत सुमारे 46 लाख एवढी आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here