विधानसभा अध्यक्षपदासाठी ठरला “मविआ”चा उमेदवार

आपली प्रतिष्ठा पणाला लावत “मविआ”ने विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार देत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आ. राजन साळवी यांनी महाविकास आघाडीच्या वतीने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला अर्ज सादर केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर होणा-या या निवडणूकीत दोन्ही बाजूच्या उमेदवारांची नावे घोषित झाली आहे. त्यामुळे ही लढत जोरदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे आपले मुख्यमंत्रीपद गमावून बसले आहेत. बंडखोर गटाला धक्का देण्यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकीत राजन साळवी यांना पुढे केले आहे. भाजपने या निवडणूकीत मुंबईतील आमदार राहुल नार्वेकर यांना उभे केले आहे. आमच्याकडे 170 पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून होत आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here