तायक्वांदो स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे नेत्रदिपक यश

जळगाव : अमरावती येथे झालेल्या युथ फायटर्स पहिल्या विदर्भ तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी ८ सुवर्ण, ११ रौप्य, १३ कांस्यपदक पटकावून स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. ही दि. २९ ते ३० जून दरम्यान आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत जळगाव, पुणे,नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, अमरावती,जालना, येथिल ४०० च्या वर खेळाडूंनी सहभाग घेतला यात जळगाव येथील ५४ खेळाडूंनी यशस्वी सहभाग नोंदविला स्पर्धेतील प्रथम विजेते खेळाडू पुष्पक महाजन, श्रेयांग खेकारे, दिनेश चौधरी, यश जाधव, रोहन लोणारी,धनश्री गरुड, स्वराली वराडे, वंशिका मोताले यांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. यात रौप्य पदक विजेते पुढील प्रमाणे : जयेश पवार, लोकेश महाजन, यश शिंदे, निकीता पवार, समृद्धी बागुल, दर्शन कानवडे, दर्शन बारी, साहिल बागुल, जयदीप परदेसी, नियती गंभीर, ऋतिका खरे, आभा बाजट यांचा समावेश आहे.

कास्य पदक विजेत्यांमध्ये प्रविण खरे, जिवनी बागुल,ललित महाजन, संकल्प गाढे, खुशी बारी, अनिरुद्ध महाजन, परमऱश्री सोनार, दानिश तडवी, हेमंत गायकवाड, चैतन्य जोशी, अर्नव जोशी, तन्मय माटे, साहिल बेग इत्यादी सर्व विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक जयेश कासार, जयेश बाविस्कर, जिवन महाजन, ( रावेर ) अमोल राठोड ( जळगाव ) श्रीकृष्ण देवतवाल (शेदुंर्णी ) सुनील मोरे ( पाचोरा ) तसेच मुख्य प्रशिक्षक अजित घारगे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. या सर्व विजेत्या खेळाडूचे संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, खजिनदार सुरेश खैरनार, सदस्य सौरभ चौबे, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, नरेंद्र महाजन, अरविंद देशपांडे तसेच रावेर संघटनेचे अध्यक्ष दिपक नगरे, डाॅ. संदीप पाटील, डॉ. सुरेश महाजन, रविंद्र पवार, सौ. मनीषा पवार, श्रीकांत महाजन, जे. के. पाटील सर , राहुल पाटील, श्रीकृष्ण चौधरी, हरिभाऊ राऊत आदींनी कौतुक केले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here