65 + कलाकारांना शूटिंगची परवानगी

65 + कलाकारांना शूटिंगची परवानगी

मुंबई : कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्र सरकारने 65 वर्षांवरील कलाकारांना शुटिंगसाठी परवानगी नाकारली होती. याशिवाय मालिकांमध्ये सोशल डिस्टन्सचे नियम पाळून चित्रिकरणाची अट घातली होती. या निर्णयामुळे 65 वर्षांहून अधिक  वयाचे कलाकार नाराज झाले होते. या निर्णयाच्या विरुद्ध सिने कलाकारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्य़ायालयाने आज त्यांना काम करण्याची परवानगी दिली आहे. 

गेल्या कित्येक दिवसांपासून ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना चित्रीकरणात सहभागाची बोललीवूड मधून मागणी होती. ही मागणी सरकारने फेटाळली होती.  त्यामुळे ज्येष्ठ कलाकारांना शूटिंगसाठी नो एंट्री होती. शासनाच्या या निर्णयावर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची जाहीर नाराजी होती.  65 वर्षापुढील कलाकार आपली काळजी स्वात: घेत काम करतील. सरकारने त्यांना परवानगी द्यावी, असेही गोखले म्हणाले होते. 

ज्येष्ठ नागरीकांना इतर काम करण्यास मज्जाव नाही, तर शूटींगवर जाण्यास बंदी अयोग्य असल्याचे मत हायकोर्टाने नोंदविले आहे. ज्येष्ठ कलाकार प्रमोद पांडे आणि ‘इंपा’ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने तसा निर्णय दिला आहे. शुटींगसाठी करण्यात आलेले नियम असे आहेत. शुटींग सुरु झाल्यावर उपस्थित लोकांनी चांगल्या दर्जाचे मास्क आणि ग्लोव्हज वापरावेत. हस्तांदोलन, मिठी अथवा चुंबन या गोष्टी टाळणे गरजेचे आहे.

प्रत्येकाने एकमेकातील अधिकाधिक अंतर राखावे. सेटवर, ऑफिसेसमध्ये, स्टुडिओमध्ये सिगरेट पिताना ती शेअर करू नये. सेट, ऑफिसेस वेळच्या वेळी सॅनिटाईज करावीत. चित्रीकरणासाठी हजर असलेल्या लोकांची महिन्यातून एकदा कोरोना चाचणी करणे अनिर्वाय असेल. साठ वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांना वर्क फ्रॉम होमची मुभा द्यावी. चित्रीकरण सुरू झाल्यानंतर सेटवर किमान तीन महिने साठ वर्षांवरील लोकांकडून काम करून घेऊ नये. 

चित्रीकरण सुरू होण्याआधी सर्वांना ४५ मिनिटं आधी पोहोचावे लागेल.सेटवर स्वच्छ बाथरूम, वॉश बेसिन असावी. वापरला जाणारा विग वापरण्याआधी आणि नंतरही धुवावा.प्रत्येकाने फक्त स्वतःचाच मेकअप किट वापरावा.मेकअपमन आणि हेअर स्टायलिस्ट यांनी कायम हातात ग्लोव्हज आणि चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here