तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव : येथील खंडेराव नगरातील ३५ वर्षीय तरूणाने जळगाव-शिरसोली दरम्यान रेल्वे लाईन खाली आत्महत्या केली आहे. आज सकाळी सदर घटनाउघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. रमेश दगडू भोई (३५) रा. नशिराबाद ता.भुसावळ ह.मु.खंडेराव नगर जळगाव हे शेंगदाणे, फुटाणे विक्री करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते.

त्यांचा पत्नीसोबत कौटुंबिक वाद असल्याने त्यांची पत्नी मुलासह माहेरी निघूनगेली आहे. खंडेराव नगरात आई कमलाबाई, वडील दगडू भोई आणि भाचा अभिजित भोईयांच्यासोबत ते रहात होते. गेल्या चार ते पाच वर्षांपासून त्यांची पत्नी माहेरी गेली आहे. त्या नैराश्येतून मध्यरात्री ते घराबाहेर पडले.

दरम्यान भाचाअभिजित याने रात्रभर त्यांची शोधाशोध  केली. आज सकाळी जळगाव -शिरसोली दरम्यान रेल्वे लाईन खाली त्यांचा मृतदेह आढळून आला.रामांनद नगर पोलीस स्टेशनला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून तपास विश्वनाथ गायकवाड करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here