सीआयएससीई बोर्डाच्या परिक्षेत देशातून अनुभूतीची रितीका देवडा तृतीय

जळगाव – अनुभूती निवासी स्कूलच्या दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता 12 वी आयएससीचा निकाल नुकताच जाहिर झाला. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलची रितीका देवडा ही विद्यार्थीनी देशातून सीआयएससीई रॅंकच्या मेरिटमध्ये तिसरी तर अनुभूती स्कूलमधून ती पहिली आली आहे. वाणिज्य शाखेतील रितीका अरूण देवडा हिला 99.25 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. तसेच रितीका ही वाणिज्य शाखेतून अनुभूती स्कूलमध्ये प्रथम आली आहे. संपूर्ण भारतातून 96,940 विद्यार्थ्यांनी 12 वी इयत्तेसाठी परिक्षा दिली. त्यापैकी 96,340 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात 45,579 विद्यार्थीनी तर 50,761 विद्यार्थी यांचा समावेश आहे. अनुभूती स्कूलमधून 29 विद्यार्थी या परिक्षेत बसले होते.

शिक्षकांच्या अथक परिश्रमातुन  यश – रितीका देवडा —- शिक्षकांनी सांगितलेला अभ्यासाच्या मार्गावर सातत्य ठेवल्यामुळेच यश प्राप्त झाले आहे. यासाठी आवश्यक ग्रंथालयापासून ते शिक्षकांच्या परिश्रमातूनच मला देशातून तिसऱ्या मेरिटपर्यंत पोहचता आले. विविध साहित्यातून दैनदिन अभ्यासाचे नियोजन केल्याने हे यश मिळू शकले.  स्कूलचे प्राचार्य आणि सर्व शिक्षक यांच्या प्रयत्नातूनच यशस्वी होता आले. संस्थापक भवरलालजी जैन यांच्या प्रेरणेतूनच ‘यश’ याविषयावर स्वत:चे पुस्तकसुद्धा प्रकाशित करता आले. रितीकाचे वडील अरूण देवडा व्यावसायीक असून आई गृहिणी आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here