जळगाव जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे मलकापूरला उघड

मलकापूर : जळगाव, बुलढाणा व मध्य प्रदेशातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे मलकापूर शहर पोलिसांच्या तपासात उघड झाले आहेत. मलकापूर शहर पोलिसांनी अटक केलेल्या टोळीतील चौघे मुक्ताईनगर तालुक्यातील कु-हा काकोडा येथील रहिवासी आहेत. अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींच्या ताब्यातून 12 लाख 60 हजार रुपये किमतीच्या 21 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

आकाश उर्फ संतोष रावळकर, राम शंकर मनोहर भोलनकर, पवन संजय जवरे, प्रशांत समाधान बोरले (सर्व रा. कुऱ्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर – जळगाव), अमरदीप बाबुराव उमाळे बहापुरा ता. मलकापूर, संतोष समाधान कवळे रा. आडविहीर ता. मोताळा अशी अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत.

मलकापूर शहरातील द्वारकानगर येथील राम विजय राऊत यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार मलकापूर शहर पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासात सहा मोटार सायकल चोरटे व त्यांच्या ताब्यातून 21 मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

अटकेतील चोरट्यांनी राज्यासह राज्याबाहेर वेगवेगळ्या ठिकाणावरून दुचाकीची चोरी करून त्या विविध ठिकाणी विक्री केल्याचे कबुल केले आहे. चोरट्यांनी जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, मलकापूर, मलकापूर, नांदुरा, खामगाव, शेगाव, वर्धा येथे मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली. गुन्हे शोध पथकातील सहायक पोलिस निरीक्षक सुखदेव भोरकडे, पोलिस उपनिरिक्षक बालाजी सानप, पोहेकॉ मुंडे, पोकॉ ईश्वर वाघ, पोकॉ संतोष कुमावत, गोपाळ तारुळकर, अनिल डागोर, आसिफ शेख, सलीम बर्डे, प्रमोद राठोड आदींनी या तपासकामात सहभाग घेतला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुखदेव भोरकडे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here