‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ — अमृता फडणवीसांना किशोरी पेडणेकरांचं गाण्यातूनच प्रत्युत्तर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी “झी मराठी” या चॅनलवरील “बस बाई बस” या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. उद्धव ठाकरे यांना टार्गेट करुन त्यांची खिल्ली उडवण्याचा हा चुकीचा प्रकार असल्याचे म्हटले जात आहे.
‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ हे गाणं ऐकताच आपल्याला उद्धव ठाकरे यांचा चेहरा आठवत असल्याचं त्यांनी वक्तव्य केलं आहे. आता शिवसेना नेत्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांना गाण्यातूनच प्रती उत्तर दिले आहे. या गाण्यात पेडणेकरांसह महिला शिवसैनिकांनी फडणवीसांच्या उपमुख्यमंत्रीपदावर निशाणा साधला आहे.

मी शिवसैनिक आहे. मी गाणं म्हणेल त्यातच तुम्हाला कळेल की कुणाच्या नशिबाची थट्टा कुणी मांडली, असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी ते गाणं म्हटलं आहे. पेडणेकरांनी गायलेल्या गाण्याचे बोल —- “एक होता निर्मळ माणूस……..देवेंद्र त्याचे नाव………मुख्यमंत्रीपदासाठी कटकारस्थानं केली……त्यांना एका अमृताची दृष्ट लागली हो……त्यांच्या नशिबी उपमुख्यमंत्रीपद आले आहे हो…….कशी नशिबाने थट्टा आज मांडली.

झी मराठी या वाहिनीवरील बस बाई बस या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अमृता फडणवीस यांना ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ हे गाणं ऐकल्यावर कोणाचा चेहरा समोर येतो? असा प्रश्न सुत्रसंचालक सुबोध भावे यांनी विचारला होता. त्यावर “उद्धवजी ठाकरे यांचा खूप मान आणि सन्मान. पण हे गाणं ऐकल्याबरोबर मला त्यांचाच चेहरा आठवला.” असे उत्तर दिले होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here