मंगळ ग्रह मंदीर परिसरातून चोरी गेलेल्या मोबाईलसह चोरटा ताब्यात

जळगाव : अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदीर परिसरातून चोरी गेलेला मोबाईल चोरट्यासह अमळनेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने हस्तगत केला आहे. चोरट्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. समाधान जिभाऊ वाघ रा. भिम नगर ताडेपुरा अमळनेर असे चोरट्याचे नाव आहे.

पनवेल ता.जिल्हा ठाणे येथील सत्यवान अशोक दारोळे हे आपल्या परिवारासह अमळनेर येथे मंगळग्रह मंदीरात देव दर्शनासाठी आले होते. सर्व सदस्य मंदीरात गेले असतांना चालक कारचा दरवाजा उघडा ठेवून कारमधे झोपला होता. या संधीचा गैरफायदा घेत चोरट्याने कारमधील मोबाईल चोरुन नेला होता. दर्शन आटोपल्यानंतर मोबाईल चोरीला गेल्याचे समजल्यानंतर सर्व जण पनवेल येथे निघून गेले होते.

पनवेल येथे गेल्यानंतर दारोळे यांनी मंगळ ग्रह मंदीर संस्थानसोबत संपर्क साधून आपली तक्रार सांगितली. आपण तक्रार देण्यासाठी पनवेल येथून येवू शकत नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. मंगळ ग्रह मंदीर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी यांनी अमळनेर पोलिस स्टेशनला याप्रकरणी तक्रार दाखल केली.

सीसीटीव्ही तपासाच्या माध्यमातून ताडेपुरा येथील रहिवासी समाधान जिभाऊ वाघ यास ताब्यात घेत त्याच्याकडून मोबाईल हस्तगत करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पो.नि. जयपाल हिरे यांच्या पथकातील हे.कॉ. सुनिल पाटील, पोलिस नाईक मिलींद भामरे, सुर्यकांत साळुंखे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here