पहिल्या दिवशी हत्या, दुस-या दिवशी कापला गळा व हात– तिस-या दिवशी धड कापत सौरभकडून प्रेयसीचा घातपात

औरंगाबाद (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : अंकिता जालना येथील सामान्य कुटूंबात लहानची मोठी झाली. वयात आल्यानंतर लवकरात लवकर तिचे हात पिवळे करुन देण्यासाठी तिचे आई वडील सरसावले होते. अंकितासाठी योग्य आणि सुस्वरुप वर शोधण्यासाठी त्यांनी शिघ्रगतीने प्रयत्न सुरु केले. त्यात त्यांना लवकरच यश देखील आले. निवडक नातेवाईकांच्या मध्यस्तीने आलेले शिऊर येथील महेश श्रीवास्तव या तरुणाचे स्थळ त्यांना योग्य वाटले. महेश श्रीवास्तव या तरुणाचे मिठाईचे दुकान, घरदार एकंदरीत सर्वांना योग्य वाटले. महेश श्रीवास्तव या तरुणाच्या स्थळाला सर्वानुमते होकार देण्यात आला. साधारण चार वर्षापुर्वी अंकिता आणि महेश यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला.

जालना येथील माहेर सोडून अंकिता शिऊर येथे पतीच्या घरी नांदण्यास आली होती. लग्नानंतर लवकरच दोघांच्या संसार वेलीवर एका कन्यारत्नाचे आगमन झाले. एकंदरीत अंकिता आणि महेश यांचा संसार सुखाने सुरु होता. मात्र का कुणास ठाऊक अंकिताला काय अवदसा आठवली? ती रहात असलेल्या घरासमोर सौरभ लाखे नावाचा तरुण रहात होता. सौरभ लाखे या तरुणाच्या प्रेमात ती पडली.

सौरभ हा एक विवाहीत तरुण होता. गावातील शंकरस्वामी मंदिरासमोर त्याचे फर्निचरचे दुकान आहे. फर्निचरचे दुकान सांभाळून तो पत्रकारिता देखील करत होता. वडील सेवानिवृत्त शिक्षक आणि आई अंगणवाडी सेविका अशी त्याची कौटूंबिक पार्श्वभुमी. चार बहिणींचा तो एकुलता एक भाऊ. सर्व काही सुरळीत सुरु असतांना सौरभ देखील विवाहीत अंकिताच्या प्रेमात पडला. दोघांची घरे एकमेकांच्या घरासमोर असल्यामुळे त्यांची नजरानजर होण्यास वेळ लागत नव्हता. दररोज त्यांचा आखो आखोमे कार्यक्रम पार पडत असे.

अंकिता आणि सौरभ हे दोघे विवाहीत असूनही दोघांमधे प्रेमाचा अंकुर फुलण्यास वेळ लागला नाही. दोघे चोरुन लपून एकमेकांना भेटू लागले. दोघांच्या वयात साधारण अकरा वर्षाचे अंतर होते. अंकिता 24 वर्षाची तर सौरभ हा 35 वर्षाचा होता. दोघांच्या प्रेमसंबंधाची भणक एकमेकांच्या घरी लागली. त्यामुळे श्रीवास्तव आणि लाखे परिवारात वाद होण्यास सुरुवात झाली. अंकिताला पती महेश पेक्षा सौरभ लाखे हा जवळचा वाटू लागला. ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. नातेवाईकांनी लाख विरोध करुन देखील ती सौरभचा नाद सोडण्यास तयार होत नव्हती. तरुण वय असतांना प्रेमात पडलेली अंकिता कुणालाही जुमानत नव्हती. तिला सासर आणि माहेरचे नातेवाईक समजावून संसार टिकवून ठेवण्यास सांगत होते. मात्र तिला रक्तातील नात्यापेक्षा विवाहीत प्रियकर सौरभ जवळचा वाटत होता. आपण एका मुलीची माता आहोत आणि आपल्याला पती आणि संसार असल्याचे ती पार विसरुन गेली होती. सौरभ देखील आपण विवाहीत असून आपल्याला पत्नी आणि एक मुलगी असल्याचे साफ विसरुन गेला होता.

अखेर हे प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत गेले. मात्र दोघे विवाहीत प्रेमी कुणालाही जुमानत नव्हते. दोघे प्रेमी आपले  प्रेमसंबंध सुरुच ठेवण्याच्या मुद्द्यावर ठाम होते. अंकिताने पती आणि साडेतीन वर्षाच्या अपंग मुलीला सोडून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. 14 डिसेंबर 2020 रोजी अंकिता घर सोडून निघून गेली. ती शहरात एकटीच राहू लागली. त्यामुळे तिच्या पतीसह नातेवाईकांनी ती हरवल्याबाबत शिऊर पोलिस स्टेशनला मिसींग दाखल केली. पोलिसांच्या मदतीने तिचा पत्ता शोधून काढत पती व नातेवाईकांनी तिची भेट घेतली. तिची समजूत घालत तिला गोडी गुलाबीने घरी आणले. त्यानंतर पुन्हा 12 मार्च 2022 रोजी अंकिता घरातून एकटीच निघून गेली. त्यामुळे पुन्हा तिच्या पतीने ती हरवल्याची मिसींग दाखल केली. यावेळी तिने पोलिसांना स्पष्ट सांगितले की मी स्वत:हून पतीपासून विभक्त रहात आहे. त्यामुळे तिच्या पतीसह नातेवाईकांनी तिचा नाद सोडून दिला. यावेळी तिला समजावण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. 

सौरभच्या मदतीने तिने शहरातील डी मार्ट समोर असलेल्या नवजीवन कॉलनीत भाड्याने घर घेतले. स्त्री ही अल्प काळाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते असे म्हटले जाते. मात्र सौरभच्या प्रेमात बुडालेल्या अंकिताने आपल्या अपंग मुलीचा देखील विचार केला नाही. ती एकटीच वेगळी रुम घेवून शहरात राहू लागली. अंकिता एकटी वेगळी राहू लागल्याने सौरभ लाखे आणि अंकिता या दोघांना मोकळे रान मिळाले. केव्हाही कधीही अंकिताला भेटण्यासाठी सौरभ तिच्या रुमवर येवू लागला. दोघांचे प्रेमसंबंध बरकरार होते. सौरभला अंकितासोबत प्रेमसंबंध कायम ठेवायचे होते मात्र तिच्यासोबत लग्न करायचे नव्हते. सौरभचे आपल्यावर जीवापाड प्रेम आहे आणि तो आपण सांगू तसे वागेल या भ्रमात अंकिता होती. लवकरच तिने त्याच्याकडे लग्नाचा तगादा सुरु केला. अंकिताने लग्नाचा विषय काढला म्हणजे हसत खेळत तिच्याजवळ येणारा सौरभ क्षणात नाराज होत असे. तो तिच्यासोबत लग्न करण्यास राजी होत नव्हता. इथेच दोघांमधील दुफळी निर्माण होण्यास सुरुवात झाली. तिच्या नेहमीच्या लग्नाच्या तगाद्याने सौरभ वैतागला होता. त्याचे मित्र देखील त्याला चुकीचे परिणाम होण्याअगोदर तुम्ही दोघे विवाहबद्ध व्हा असा सल्ला देत होते. मित्रांचा सल्ला ऐकल्यावर तो अजूनच नाराज होत असे. तो तिच्यासोबत लग्न करण्यास टाळाटाळ करत होता. दोघांच्या प्रेमाचा सिलसिला गेल्या दोन वर्षापासून सुरु होता.

अखेर अंकिताच्या जीवनातील अखेरचा तो दिवस जवळ आला. 15 ऑगस्ट रोजी संपुर्ण भारतात स्वातंत्र्याचा 75 वा गौरवशाली अमृत महोत्सव साजरा केला जात होता. या दिवशी सौरभ तिला भेटण्यासाठी आला तो अखेरचा. सकाळीच तिच्याकडे आल्यानंतर तिने त्याच्यासोबत लग्नाचा विषय काढला. त्याला नेहमीप्रमाणे हा विषय नको होता. शब्दामागे शब्द वाढत गेला. अखेर संतापाच्या भरात त्याने तिचा गळा आवळून खून केला. तिची हालचाल कायमची बंद झाली होती. ती मरण पावल्याची खात्री झाल्यानंतर घराला बाहेरुन कुलुप लावून तो निघून गेला.

त्याननतर 16 ऑगस्टचा दुसरा दिवस उजाडला. या दिवशी तो पुन्हा तिच्या मृतदेहाजवळ आला. यावेळी त्याने हत्यार सोबत आणले होते. या हत्याराने त्याने तिच्या मृतदेहाची मान धडावेगळी केली. एक दिवस अगोदरच ती मरण पावली असल्यामुळे तीचा प्रतिकार करण्याचा विषयच नव्हता. तिचा मृतदेह त्याच्यासोबत काय प्रतिकार करणार होता. मान धडावेगळी केल्यानंतर त्याने तिचे हात देखील धडावेगळे केले. तिची मान आणि दोन्ही हात त्याने एका पिशवीत भरले. ती पिशवी गुपचूप घेवून तो त्याच्या फर्निचरच्या गोडावूनमधे आला. अवयवने भरलेली ती पिशवी त्याने फर्निचरच्या गोडावूनमधे ठेवली.

त्यानंतर 17 ऑगस्टचा तिसरा दिवस उजाडला. तिसरा दिवस उजाडल्यानंतर तो एर्टीगा कार घेवून तिच्या रुमवर आला. तिच्या धडाची दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाली होती. कुणाला शंका येवू नये आणि तिच्या धडाची दुर्गंधी जास्त पसरु नये म्हणून त्याने रुम फ्रेशनरचा वापर केला. तिच्या उर्वरीत धडाला नेणे सोपे व्हावे म्हणून त्याने त्याचे तुकडे केले. तिच्या धडाचे तुकडे गोणीत लपवून पटकन नेत असतांना परिसरातील लोकांनी पाहिले. एका भाडेकरी महिलेस त्याच्यावर संशय आला. त्या महिलेने हा प्रकार घरमालकाला सांगितला. त्यांनी हा संशयास्पद प्रकार पोलिसांना कळवला.

माहिती मिळताच सिडको पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार, विनोद सलगरकर, सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा वायदंडे, उपनिरीक्षक निशिगंधा म्हस्के आदींनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. वरच्या मजल्यावर राहणारी भाडेकरी महिलेने अंकिताला गेल्या तिन दिवसात सतत फोन लावले. मात्र प्रत्येकवेळी सौरभ तिचे फोन उचलत होता. त्यानंतर रुममधून दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाली होती. हा प्रकार त्या भाडेकरी महिलेने घरमालकास सांगितला. घरमालकाने पोलिसांना फोन करुन बोलावून घेतले होते. 

पोलिसांनी त्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी खोलीत अंकिताच्या गादीवर रक्त सांडलेले आढळून आले. फरशीवरचे रक्त वाळलेले दिसून आले. पोलिसांच्या सांगण्यानुसार घरमालकाने सौरभला फोन करत कुठे आहे अशी विचारणा केली. त्यावर मी खुलताबादला आहे असे पलीकडून उत्तर मिळाले. या माहितीच्या आधारे  पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी नियंत्रण कक्षाला कळवून त्याची गाडी अडवण्यास सांगितले. देवगाव रंगारी पोलिसांच्या नाकाबंदीत पळून जाणारा सौरभ हा अंकिताच्या धडासह पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर सिडकोचे पोलिस उपनिरीक्षक अशोक अवचार यांनी लागलीच आपल्या सहकारी कर्मचा-यांसह त्याला तेथे जावून ताब्यात घेत अटक केली. अटक करण्यात आलेल्या सौरभला सात वर्षाची मुलगी असून पत्नी गर्भवती आहे.

सुखाने सुरु असलेला आणि भरलेला संसार सोडून अंकिताने प्रियकर सौरभची साथ धरली. मात्र तिच्या वाट्याला दुख:च आले. तिच्या या कृत्यामुळे तिचा सुखाचा संसार सोडला. तिने  मुलीला देखील सोडले. तिच्यापासून तिचे माहेरचे आणि सासरचे सर्व जण दुरावले. एकटी राहण्यास सुरुवात केल्यानंतर तिला नातेसंबंधाचे महत्व समजण्यास सुरुवात झाली. मृत्युपुर्वी तिने एक डायरी लिहून ठेवली होती. आई वडील आणि वहिनीला उद्देशून लिहितांना तिने आपल्या मनातील खंत व्यक्त केली होती. पिलु…मिस यु असे तिने आपल्या मुलीला उद्देशून लिहिले होते. पतीपासून विभक्त झाल्याची खंत देखील तिने लिहिलेल्या डायरीत असल्याचे आढळून आली आहे.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here