जळगाव शहरात धारदार शस्त्राने तरुणाची हत्या

crimeduniya
[email protected]

जळगाव : जळगाव शहरातून जाणा-या महामार्गालगत शिवकॉलनी परिसरात दोघा तरुणांमधे झालेल्या वादात एकाची हत्या करण्यात आली. मोबाईलच्या वादातून सदर हत्या झाल्याचे म्हटले जात आहे. 21 ऑग़स्टच्या सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अक्षय अजय चव्हाण (23) असे पिंप्राळा परिसरातील मयत तरुणाचे नाव आहे.

शिवकॉलनी स्टॉपसमोर असलेल्या मद्यविक्रीच्या दुकानाजवळ आज सायंकाळी झालेल्या वादात सुरुवातीला हाणामारी व नंतर खूनाची घटना घडली. वादाचे स्वरुप वाढत गेल्याने दोन गट अमोरासमोर येवून भिडले. या घटनेतील मयत अक्षय चव्हाण याने बाळू पवार याला दगड मारला. भावाला दगड मारल्याचा राग मनात ठेवून बाळूने अक्षय यास धारदार शस्त्राने वार करुन जखमी केले. जखमी अक्षयला दवाखान्यात नेले असता त्याला मयत घोषीत करण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास रामानंद नगर पोलिस करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here