पोलीस अधिकाऱ्यांच्या बढत्या, बदल्यांचा लगाम अजुनही ताणलेलाच

IPS

मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या व बदल्यांना लगाम बसलेला आहे. तो लगाम अजुनही सैल होण्यास तयार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. या बदल्या व बढत्यांचा वारु कधी उधळणार याची पोलिस दलात अधिकारी वर्गाला प्रतिक्षा लागून आहे. कुणाची कुठे नियुक्ती करायची याबाबत महाविकास आघाडी सरकारमधे अजूनही निश्चीतता नसल्याचे म्हटले जात आहे. बदल्या व बढत्यांचे दार कधी किलकिले होते याकडे अधिकारी वर्गाचे लक्ष लागलेले आहे.
आयपीएस ते उपनिरीक्षक दर्जाच्या सर्वसाधारण व विशेष बदल्यांबाबत अद्याप पर्यंत तिनवेळा मुदत वाढवण्यात आली.

आता नव्याने स्वातंत्र्य दिनाची तारीख ठरवण्यात आली आहे. मात्र तोपर्यंत देखील महाविकास आघाडी सरकारमधे एकविचार झाला नाही तर अजून मुदतवाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.मार्च महिन्यात कोरोना विषाणूची तिव्रता सुरु होती. ती तिव्रता नाही म्हटली तरी बरीच ओसरली आहे. सरकारी कारभार पुर्वपदावर येण्याची लक्षणे दिसून येत आहे. गृह विभागातील महत्वाच्या पदावरील अधिकारी वर्गाचा कार्यकाळ केव्हाच पुर्ण झाला आहे. ते अधिकारी नवीन ठिकाणी बदलीवर, बढतीवर जाण्याच्या प्रतिक्षेत आहे.

अधिकारी वर्गातील नाराजी लक्षात घेता विशेष बाबीत 31 जुलै पर्यंत सरासरी पंधरा टक्के अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या बदल्या करण्याची सामान्य प्रशासन विभागाने मंजुरी दिली होती. मात्र गृह विभाग वगळता इतर विभागाच्या बदल्या निर्धारीत मुदतीत करण्यात आल्या. पोलिस अधिकारी वर्गाच्या बदल्यांच्या पॉलीसीबाबत डीजी कार्यालय व गृह विभाग तसेच सत्तेत सहभागी असलेले तिहेरी सरकार यांच्यात एकवाक्यता होवू शकली नाही. गृहखाते रा.कॉ. कडे असले तरी काही ठिकाणी आयुक्त व अधिक्षकांच्या नेमणूकीबाबत इतर दोन पक्ष आग्रह धरुन आहेत. त्यामुळे हा पेच अजून सुटलेला नाही. या बदल्यांच्यासाठी 10 ऑगस्टची मुदत आता 15 ऑगस्ट पर्यंत लांबली आहे.

अती उच्च पातळीवरील पदांमधे ठाणे, पुणे, नवी मुंबई, नागपूर, एसआयडी, एटीएसचे आयुक्त यासह अनेक जिल्हा पोलिस अधिक्षक बदलले जाण्याचे संकेत दिले जात आहेत. अप्पर महासंचालक म्हणून बढती झालेले विनयकुमार चौबे, आयजी अमितेशकुमार, नवल बजाज, प्रवीण साळुंखे यांची बढती आहे. दहाहून अधिक उपायुक्त, अधीक्षक दर्जाच्या अधिका-यांना प्रमोशन दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

अनेक महत्वाची, जबाबदारीची पदे रिक्त आहेत. त्यात एसीबी चे महासंचालक, मुंबई सीआयडी (क्राइम) सहआयुक्त, नागपूरच्या नक्षलवाद विरोधी अभियानाचे महानिरीक्षक, वैधमापन शास्त्र विभागातील अप्पर महासंचालक दर्जाच्या नियंत्रकाचा या रिक्त पदांमधे समावेश आहे. केंद्रातून प्रतिनियुक्तीहून परत आलेले अप्पर महासंचालक सदानंद दाते, विशेष महानिरीक्षक निखिल गुप्ता, ब्रिजेश सिंग हे देखील प्रतिनियुक्तीची वाट बघत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here