जिल्हास्तरीय “जैन चॅलेंज कॅरम स्पर्धा 2022” उत्साहात

जळगाव : जैन स्पोर्टस ॲकडमी आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लि.तर्फे प्रायोजित जिल्हास्तरीय आंतर शालेय 12 वर्ष वयोगटाखालील ‘जैन चॕलेंज कॕरम स्पर्धा-2022’ या स्पर्धेला सुरूवात झाली. कांताई सभागृह येथे कॕरम स्पर्धेचे कॕरम खेळून उद्घाटन झाले. उद्घाटनाप्रसंगी जैन स्पोर्टस ॲकडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे, जैन इरिगेशनचे विजय मोहरील, अनिल जोशी, आंतरराष्ट्रीय कॕरमपटू आयेशा खान, माजी राष्ट्रीय विजेता योगेश धोंगडे यांच्यासह सर्व सहभागी शाळांचे क्रीडाशिक्षकांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील पंधरा शालेय संघातील एकूण 75 खेळाडूंनी सहभाग घेतला. यात मुलींमध्ये विद्या इंग्लिश स्कूलचे, मुलांमध्ये अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल, अँग्लो उर्दू हायस्कूलचे वर्चस्व राहिले.

उद्या दि. 26 होणाऱ्या मुलींच्या उपांत्य फेरीच्या सामान्यात दुर्गेश्वरी धोंगडे विरूध्द श्रावणी मोरे (दोघंही विद्या इंग्लिश स्कूल), दुसरा उपांत्य सामन्यात पुर्वा भुतडा (विद्या इंग्लिश स्कूल) विरुध्द पुर्वी भावसार (अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल प्रायमरी) यांच्या दरम्यान सामना रंगेल. तसेच मुलांच्या उपउपांत्य फेरीत अँग्लो उर्दू हायस्कूलचे तीन खेळाडू, रायसोनी पब्लिक स्कूल व अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल प्रायमरीचे प्रत्येकी दोन खेळाडू आणि सेंट लाॕरेंस हायस्कूलचा एक खेळाडू यांनी प्रवेश केला आहे.

उपांत्य फेरीचे सामने झाल्यानंतर अंतिम फेरीचे सामने होतील. विजेत्या स्पर्धक व शाळांना जैन चँलेंज चषक व प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात येईल. पारितोषिक वितरण समारंभ कांताई सभागृह येथे उद्या दि. 25 ला दुपारी 2 वाजता व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष यूसफ मकरा, महाराष्ट्र कॕरम असोशिएशनचे उपाध्यक्ष मंजूर खान व जळगाव जिल्हा कॕरम असोसिएशनचे सचिव नितीन बर्डे यांच्या उपस्थिती होईल. सय्यद मोहसीन, आयशा खान, योगेश धोंगडे, सय्यद जुबेर यांनी स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले आणि स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here