मर्डरच्या गुन्ह्यातील दोघांना अटक

जळगाव : जळगाव शहरातील एसएमआयटी महाविद्यालयानजीक निवृत्ती नगर परिसरात झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी दोघा संशयीतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सकाळी साडेसात वाजता पुणे येथून अटक करण्यात आली आहे. मनिष नरेंद्र पाटील (रा. अहमदाबादवाडा आव्हाणे ता. जि. जळगाव आणि भुषण रघुनाथ सपकाळे (रा. डॉ. आंबेडकर पुतळयामागे खेडी खुर्द ता. जि. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयीतांची नावे आहेत.

भावेश उत्तम पाटील या निवृत्ती नगरात राहणा-या तरुणाची तिक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी तपासात निष्पन्न झालेल्या दोघा संशयितांच्या मागावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मागावर होते. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनिष नरेंद्र पाटील व भुषण रघुनाथ सपकाळे या दोघांना पुणे शहरातील तळेगाव रस्त्यावरुन अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पोलीस अंमलदार सफौ. रवी नरवाडे, पोहेकॉ संजय नारायण हिवरकर, पोहेकॉ राजेश बाबाराव मेंढे, पोना संतोष रामस्वामी मायकल, मुरलीधर सखाराम बारी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. दोघांना जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here