जिल्हास्तरीय आंतर शालेय ‘जैन चॕलेंज बॕडमिंटन स्पर्धा उत्साहात

जळगाव : जैन स्पोर्टस ॲकडमी आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लि.तर्फे प्रायोजित जिल्हास्तरीय आंतर शालेय 14 व 17 वर्ष वयोगटाखालील ‘जैन चॕलेंज बॕडमिंटन स्पर्धा-2022’ अनुभूती निवासी स्कूल येथे संपन्न झाली. दि. 24 ते 25 या दोन दिवसीय झालेल्या स्पर्धेचा समारोप आज झाला. या स्पर्धेत 14 वर्ष वयोगटाखालील मुलींमध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल, जळगाव विजयी ठरले. तर उपविजयी सेंट टेरेसा काॕ. इंग्लिश मिडीअम स्कूल, जळगाव ठरले. तसेच मुलांमध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल, चाळीसगाव विजयी ठरले. तर उपविजयी काकासाहेब पुर्णपात्रे माध्यमिक विद्यालय चाळीसगाव ठरले. स्पर्धेच्या 17 वर्ष वयोगटाखालील मुलींमध्ये काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, जळगाव विजयी ठरले. तर उपविजयी सेंट टेरेसा काॕ. इंग्लिश मिडीअम स्कूल, जळगाव ठरले. तसेच मुलांमध्ये सेंट टेरेसा काॕ. इंग्लिश मिडीअम स्कूल, जळगाव विजयी तर सेंट जोसेफ कॉ. इंग्लिश मिडिअम स्कूल जळगाव उपविजयी झाले.

स्पर्धेच्या सर्वाकृष्ट खेळाडू म्हणून 14 वर्षे वयोगटातील मुलींमध्ये सोम्या लोखंडे, मुलांमध्ये जयवंत पवार तर 17 वर्ष वयोगटाखालील मुलींमध्ये सत्ताक्षी वाणी तर मुलांमध्ये ऊजेर देशपांडे यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. जिल्ह्यातील 35 शाळांमधून 92 संघ सहभागी झाले होते. त्यात 550 खेळाडूंनी आपले कौशल्य दाखविले. विजयी व उपविजयी शालेय संघातील स्पर्धेकांना चषक, पदक, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अनुभूती निवासी स्कूलचे प्राचार्य देबासिस दास, जैन स्पोर्टस ॲकडमीचे प्रशिक्षक किशोर सिंह यांच्याहस्ते पारितोषिक वितरण झाले.

जळगाव जिल्हा बॕडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, जैन स्पोर्टस ॲकडमीचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अरिवंद देशपांडे, क्रीडा समन्वयक रविंद्र धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. जैन चॕलेंज बॕडमिंटन स्पर्धेत मुख्य पंच किशोर सिंह, सहपंच जाझीब शेख, रौनक चांडक, गीता पंडीत, मिहिर कुलकर्णी, अर्ष शेख, करण पाटील, व्रजनाभ कोल्हे, सुफियाॕन शेख, धिर वेद, शुभम चांदसरकर, ऊजेर देशपांडे, देव वेद, ऋवेदा काबरा, सौम्या लोखंडे यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी प्रविण ठाकरे, समिर शेख, सोमदत्त तिवारी, विकास बारी यांनी सहकार्य केले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here