बोलो जुबा केसरी….. मुकेश खन्नांची बॉलिवूड स्टार्सवर टीका

‘बोलो जुबा केसरी..’ म्हणत बॉलिवूडचे तीन-तीन सुपरस्टार्स वाईट गोष्टीच्या प्रचलनासाठी जाहिरात करत असल्याचे बघून त्यांची चीड येत असल्याचे अभिनेते मुकेश खन्ना यांनी म्हटले आहे. ते आदाब करत आहेत की बर्बाद अशी देखील टीका मुकेश खन्ना यांनी केली आहे. मुकेश खन्ना सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते विविध विषयांवर भाष्य करत असतात. यूट्यूब चॅनलवर त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये मुकेश खन्ना यांनी विमलच्या जाहिरातीवरुन बॉलिवूडच्या स्टार्संवर टीका केली आहे.

मुकेश खन्ना यांनी अजय देवगनचा फोटो ट्वीट केला असून या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटले आहे की “जेव्हा एखादी व्यक्ती समोरुन नमस्कार करते किंवा आदाब करते, तेव्हा किती छान वाटते. पण जर हा आदाब केशरी रंगाचा गैरवापर करुन गुटख्यासारख्या व्यसनाला समर्थन करत असेल, तर त्या नमस्कार/ आदाबचा राग येतो. अशा वेळी लोकांना मारायची इच्छा होते. बॉलिवूडचे तीन-तीन सुपरस्टार्स ‘बोलो जुबा केसरी..’ म्हणत अशा वाईट गोष्टीच्या प्रचलनासाठी जाहिरात करत असल्याचे बघून त्यांची चीड येते.” ते केशरी रंगाचा गैरवापर देखील करुन सुपारीच्या नावावर गुटख्याची जाहिरात करत आहेत या गोष्टीने मी संतापलो आहे.” असे म्हणत त्यांनी बॉलिवूडच्या स्टार्संवर धारेवर धरलं आहे.

विमल पान मसाला कंपनीच्या प्रमोशनसाठी अभिनेता अजय देवगन याने काही जाहिरातीत काम केले. अजयला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. अजयनंतर शाहरुखनेही या जाहिराती करण्यासाठी होकार दिला. यामुळे शाहरुखला देखील ट्रोलर्सचा सामना करावा लागला. दरम्यान अभिनेता अक्षय कुमारची एक सकात्मक प्रतिमा तयार झाली होती. सर्वत्र त्याच्या कामाची चर्चा होती. अक्षयने विमल पान मसाल्याची जाहिरात केल्याने त्याला सर्वात जास्त रोष पत्करावा लागला होता. त्याने चाहत्यांची माफी मागत पुढे अशा जाहिरातींमध्ये काम न करण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here