‘पुष्पाचा सिक्वेल येणार लवकरच, लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीची लागणार वर्णी

दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा’ची लोकप्रियता आजही चाहत्यांच्या मनावर कायम आहे. हा चित्रपट देशाच्या दक्षिण आणि उत्तर भागात सुपरहिट ठरला. पुष्पाचा सिक्वेल अर्थात ‘पुष्पा 2’ लवकरच येणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली आहे.

‘पुष्पा 2’ च्या शुटींगला ऑगस्ट रोजी सुरुवात झाली. या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी हिची एंट्री झाली आहे. निर्माता-दिग्दर्शक सुकुमार यांनी सई पल्लवीशी संपर्क साधला असून ती या चित्रपटात एक अतिशय महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारणार असल्याच्या बातम्या आहेत. मात्र निर्माते अथवा सई पल्लवी हिने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि साई पल्लवी अशा सुपरस्टार्सना एकत्र स्क्रीन शेअर करताना बघणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ चित्रपट तुफान गाजला आणि अल्लू अर्जुन फक्त दाक्षिणात्य प्रेक्षकांमध्येच नाही तर हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय ठरला. या चित्रपटातील अल्लू अर्जुनचा रावडी अंदाज सर्वांच्याच पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळालं.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here