पाकिस्तान जिंंदाबादच्या घोषणा देणा-यांना सोडणार नाही – उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पीएफआय या संघटनेवर एनआयएने केलेल्या कारवाई विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “ज्यांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या त्यांना सोडणार नाही,” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर इशारा दिला आहे. ते आज नागपूरमध्ये माध्यम प्रतिनिधींसोबत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की “महाराष्ट्रात आणि भारतात कुणी पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देणार असेल तर त्याला सोडणार नाही. त्याच्यावर कारवाई केली जाईल. ते जिथे असतील तिथून शोधून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here