गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव : गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘गांधीतिर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ या गांधीजींचे जीवन कार्य व भारतीय स्वातंत्र्य या विषयावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज शहरातील अनुभूती शाळेत प्राथमिक चाचणी घेण्यात आली. वस्तुनिष्ठ स्वरूपातील ४५ प्रश्नांची हि लेखी परीक्षा होती. यासाठी ३० मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. शाळांमधील सर्वाधिक गुण मिळविणा-या दोन पात्र विद्यार्थ्यांची दुसऱ्या मौखिक फेरीसाठी निवड करण्यात आली.

दि. १ ऑक्टोबर ला कांताई सभागृहात दुपारी ३ वाजता हि मौखिक फेरी होईल. यातील पाच संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येईल. अंतिम फेरीतील विजेत्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. मौखिक फेऱ्यांवेळी उपस्थितांनाही प्रश्न विचारण्यात येणार आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नितीन चोपडा, निलेश पाटील, तुषार बुंदे, शुभम पवार, नितीन मघडे, आचल चौधरी, जयश्री देशमुख, आकाश थिटे, तन्मय मंडल, योगेश देसाई यांनी सहकार्य केले.

दुसऱ्या फेरीसाठी निवड झालेली विद्यार्थी – कुंदन भदाणे, कार्तिक साळुंखे (स्वामी समर्थ विद्यालय), दिव्या गोसावी, हेमंत निकम (या. दे. पाटील विद्यालय), रितीशा देवरे, कृष्णगिरी गोसावी (ए. टी. झांबरे विद्यालय), पूजा शर्मा, दृष्टी महाजन (नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय), कृपाली पाटील, सोहम पाटील (का. ऊ. कोल्हे विद्यालय), नकुल पाटील, धनश्री वखरे (ब. गो. शानबाग विद्यालय), अथर्व लाड, श्रद्धा महाजन (सेंट टेरेसा), दिव्यांशी पात्रा, अर्णव चौधरी (काशिनाथ पलोड), तेजस्विनी पाटील, अंजली पाटील (प. न. लुंकड कन्या शाळा), मयुरी सोनवणे, रुपाली भोई (पी. के. गुळवे विद्यालय)

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here