आजचे राशी भविष्य (01/10/2022)

मेष : ओळखीच्या माध्यमातून व्यवसाय विस्तारास मदत होईल. मुलांच्या प्रगतीने समाधान होईल.

वृषभ : कामे मार्गी लागतील. नातेवाईकांचा सल्ला उपयुक्त ठरेल. दिवस व्यस्त राहील.

मिथुन : समाज कार्यात वेळ जाईल. नोकरीत नवीन कामे करावी लागण्याची शक्यता.

कर्क : खुप दिवसांपासून ठरवलेल्या गोष्टी पूर्ण होण्याची शक्यता. हितशत्रूदेखील आपली प्रशंसा करतील.

सिंह : कठीण काळात देखील मानसिक खंबीरता कायम ठेवा. नविन विचार अमलात आणा.

कन्या : घरात उत्साही वातावरण राहील. व्यवसायिकांना लाभदायक दिवस.

तुळ : कार्यालयात टीमवर्कचा चांगला अनुभव घ्याल. खर्चावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल.

वृश्चिक : ज्येष्ठ व्यक्तींच्या सहकार्याने चिंता दुर होण्याची शक्यता. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे.

धनु : रोजगाराच्या संधी प्राप्त होण्याची शक्यता. कार्यालयात कोणत्याही वादात शक्यतो पडू नये.

मकर : नोकरीच्या मुलाखतीत यश मिळण्याची दाट शक्यता. आजचा दिवस मध्यम फलदायी ठरेल.

कुंभ : संवादातून नवनवीन कल्पना सुचतील. मात्र, नवीन गुंतवणुकीसाठी आज अनुकूल दिवस नाही.

मीन : बचतीच्या योजना अमलात आणा. अनावश्यक खर्चाला कात्री लावा. व्यवसायात ठोस निर्णय घ्या.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here