बलात्काराच्या गुन्ह्यातील राजेशकुमार अटकेत

जळगाव : पतीला सोडून परिचीत तरुणाला भेटण्यासाठी भोपाळ येथे गेलेल्या विवाहितेवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील संशयीत आरोपीस अटक करण्यात आली आहे. राजेशकुमार पासवान असे अटक करण्यात आलेल्या परप्रांतीय तरुणाचे नाव आहे.

पिडीत विवाहीतेने सुरुवातीला भडगाव येथे राजेशकुमार विरुद्ध शुन्य क्रमांकाने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तो गुन्हा एमआयडीसी पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आला. या घटनेतील राजेशकुमार जयनारायण पासवान (21) रा. सतोर,पो स्टे नारायण वॉर्ड नंबर 8 सतोर, जिल्हा सहरसा बिहार याने विवाहितेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. तिचे काढलेले फोटो त्याने सोशल मिडीयावर व्हायरल देखील केले होते.

गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे राजेशकुमार यास एमआयडीसी पोलिस पथकाने भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेत अटक केली आहे. पोलिस उप निरीक्षक दीपक जगदाळे, पोलिस नाईक दत्तात्रय बडगुजर, पो. ना. विकास सातदिवे, पो.कॉ. छगन तायडे, महिला पोलिस नाईक मिनाक्षी घेटे व चालक हे.कॉ. खान आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे व पोलिस नाईक बडगुजर करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here