पठाण’च्या टीझरसाठी दीपिका – शाहरुखचे फोटो व्हायरल

या वर्षी मार्च महिन्यात शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो प्रसिद्ध झाले होते. या फोटोजमुळे चाहत्यांमध्ये एक क्रेझ तयार झाली होती. शाहरुख खान तब्बल तिन वर्षांच्या कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षक चांगलेच उत्सुक होते.
‘पठाण’ची घोषणा करण्यात आल्यानंतर अधिकृतरित्या जॉन अब्राहम, दीपिका पदूकोण आणि शाहरुख खान यांच्या पात्रांची पुसटशी ओळख करून देण्यात आली.

त्यानंतर सोशल मीडिया पठाण हा कायम ट्रेंडमध्ये आहे. आता पुन्हा या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानची काही छायाचित्रे बाहेर आली आहेत. या फोटोमध्ये दीपिका आणि शाहरुख त्यांच्या चित्रपटाच्या लूकमध्ये दिसत आहेत. सोशल मीडियावर या फोटोची चांगलीच चर्चा होत आहे. फिल्मफेअरच्या सोशल मिडिया अकाऊंटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

या चित्रपटाबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली असली तरी आता हळूहळू काही गोष्ट बाहेर येत आहेत. हे व्हायरल झालेले फोटो पाहून आता शाहरुखच्या ‘पठाण’च्या टीझरची वाट बघत आहेत. २ नोव्हेंबर म्हणजेच शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त ‘पठाण’चा टीझर पाहायला मिळू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोशल मिडियावर तर याची चांगलीच चर्चा सुरू आहे. नेटीजन्सनी तर ‘पठाण टीझर’ हा हॅशटॅगसुद्धा ट्रेंड करायला सुरुवात केली आहे.

अजूनतरी या चित्रपटाच्या निर्मात्यांकडून अधिकृत स्टेटमेंट आलं नसल्याने याचा टीझर उद्या येणार का हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे, पण शाहरुखचे चाहते त्याच्याकडून सरप्राइजची अपेक्षा ठेवून आहेत. पठाण २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला असून यातील सलमान खानच्या छोट्याशा भूमिकेचीही चांगलीच चर्चा होत आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here