‘बिग बॉस’मध्ये होणार राखी सावंतची एंट्री?

बिग बॉस स्पर्धक, दिग्दर्शक साजिद खानवरुन राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा यांच्यात वादाला तोंड फुटले आहे. दोघी एकमेकींवर आरोप प्रत्यारोप करत असतांना दिसत आहेत. शर्लिनने राखीच्या आरोपांवर उत्तर दिल्यानंतर आता पुन्हा राखीने शर्लिनवर टीका केली आहे. तिचा एका व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओनंतर आता पत्रकारांनी पुन्हा एकदा राखी सावंतला प्रश्न विचारले आहेत. तिच्या उत्तराने हे प्रकरण वेगळीच दिशेने जाणार अशी शक्यता आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात राखी सावंत आपल्या गाडीतून जात असताना पत्रकार तिला अडवतात आणि विचारात “बिग बॉसमध्ये तुमची वाईल्ड वार्ड एंट्री होणार आहे अशी चर्चा आहे तर तुम्ही जाणार का?” यावर राखीने उत्तर दिले “बिग बॉस वाल्यांना तुम्ही सांगा मला घ्यायाला मी जाऊन धम्माल करेन. मी दूध का दूध पानी का पानी करून टाकेन, मी साजिद खानला खास करून प्रश्न विचारेन, जनतेच्या समोर विचारेन. साजिद खानदेखील प्रश्नांची उत्तर देतील. माझा अधिकार नाही कोणाला प्रश्न विचारायचा मात्र देशातील जनतेला जाणून घ्यायचे असले तर मी नक्कीच विचारेन” अशा शब्दात तिने आपली प्रतिक्रिया दिली.

शर्लिनने साजिद खानवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. ‘बिग बॉस’च्या घरातून साजिदची हकालपट्टी करण्यासाठी तिने पोलिसांतही तक्रार दाखल केली होती. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनाही शर्लिनने पत्र लिहिलं होतं. यावरून राखीने तिच्यावर टीका केली होती. राखीने शर्लिनवर टीका करताना तिचा चेटकीण असा उल्लेख केला होता. दुसरीकडे राखीने आलिया भट्ट आई झाल्याचा राखी सावंतला अत्यानंद झाला “घरी लक्ष्मी आली आहे” असं म्हणत ती आलियाच्या मुलीचे स्वागत करत तिने मिठाई वाटली. तिचा हा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here