डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणी सहकाऱ्यांविरुध्द मुंबईत गुन्हा दाखल

Dr. payal-tadvi

जळगाव : डॉ.पायल तडवी हिच्या आत्महत्येप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. पायल हिस आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणा-यासह पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न त्यावेळी करण्यात आला होता. या प्रकरणी मुंबईत तिचा छळ करणा-या सहका-यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

डॉ. पायल हिस आत्महत्येस प्र्वृत्त करणा-या संशयीतांना इतर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळू नये यासाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने सह्यांची मोहीम राबवण्यात आली होती. तशी स्पष्ट भुमिका महाराष्ट्र शासनाने सुप्रिम कोर्टात घ्यावी असा आग्रह धरण्यात आला होता. त्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री व आदिवासी मंत्री यांचेसह समाजकल्याण मंत्री यांना देण्यात आले होते.

डॉ. पायल तडवी ही विद्यार्थीनी आदिवासी समाजाची असल्याबाबत इतर सहका-यांनी छळ केला होता. त्यामुळे डॉ. तडवी या विद्यार्थीनीने आत्महत्या केली होती. अशा जातीयवादी संशयितांना राज्यातील इतर कुठल्याही महाविद्यालयात प्रवेश मिळू नये, तशी परवानगी त्यांना मिळू नये अशी भुमिका संघटनांनी घेतली आहे. ३१ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार आहे. यापुर्वी ११ ऑगस्ट रोजी या प्रकरणी कामकाज झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here