भाजपचे दुसरे अमित शहा गुजरात विधानसभा निवडणूकीत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सर्वांना परिचीत आहेत. मात्र, भारतीय जनता पक्षात अमित पोपटलाल शाह नावाचे अजून एक जण आहेत. हे अमित शहा सलग पाचवेळा महापौर म्हणून निवडून आले आहेत. आता भाजपाने त्यांना एलिसब्रिज विधानसभेच्या जागेवरुन उमेदवारी दिली आहे. उमेदवारी मिळताच भाजपाचे दुसरे अमित शाह निवडणूकीच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. त्यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात देखील केली आहे.

अहमदाबादचे माजी महापौर अमित पोपटलाल शाह (63) विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर आपला मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यासाठी ते पायी फिरत आहेत. पण त्यांच्या वेगवान चालण्यामुळे भाजपाच्या बहुतेक कार्यकर्त्यांची दमछाक होत आहे. त्यांचा चालण्याचा वेग हा देखील एक चर्चेचा विषय ठरत आहे.

अहमदाबादमधील सोळा विधानसभा जागांपैकी एकाही जागेवर आप पक्षाचा उमेदवार निवडून येणार नसल्याचा विश्वास अमित पोपटलाल शाह यांनी व्यक्त केला आहे. ते स्वत: 80 हजारांहून अधिक मतांनी विजयी होणार असल्याची त्यांना खात्री आहे. अमित पोपटलाल शाह यांनी आपल्या उमेदवारी अर्जात 3 कोटी 15 लाखांची एकूण संपत्ती घोषित केली आहे. नर्मदा बचाव आंदोलना दरम्यान अमित शाह यांनी आंदोलनकर्त्या मेधा पाटकर यांच्यावर हल्ला केला असल्याचा एक गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे. हा खटला आजही अहमदाबाद मॅजिस्ट्रेट न्यायालयात दाखल आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here