संभाव्य घरफोडी टळली – दोघे गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : पोलिस अधिकारी व कर्मचा-याच्या सतर्कतेमुळे चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीत होणारी घरफोडी टळली असून घरफोडीच्या बेतात असलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस आणि पोलिस कर्मचारी तुकाराम चव्हाण हे दोघेही कौतुकास पात्र ठरले आहे. अकबर लुकमान खान आणि आर्यन पप्पू शेख (रा. दौला वडगाव ता. आष्टी जिल्हा बिड) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.

तुकाराम चव्हाण पो.कॉ.

याबाबत सविस्तर वृत्त असे की चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस आणि त्यांंचे सहकारी कर्मचारी तुकाराम चव्हाण हे परवा रात्री नाईट ड्युटीवर होते. नाईट ड्युटी आटोपुन दोघेही घरी जाण्याच्या बेतात होते. दरम्यान त्यांच्या नजरेस दोघे तरुण संशयास्पद हालचाली करतांना दिसून आले. दोघांचे संशयास्पद वर्तन बघून दोघांना पोलिस स्टेशनला आणले गेले. दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जातून नट खोलण्याचे पान्हे आणि रोख तिन हजार रुपये आढळले.

पोलिसी खाक्या दाखवत त्यांची विचारपूस केली असता आपण जवळपास सात ते आठ घरफोड्या केल्याचे त्यांनी कबुल केले आहे. पत्र्याचे नट खोलून दुकान फोडल्याचे दोघांवर विविध गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here