चोरी, घरफोडी करणा-यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

जळगाव : घराच्या गोडावूनचा कडीकोंडा तोडून सोन्याचे दागीने, लॅपटॉप व मोबाईलची चोरी करणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. इस्तियाक अली राजीक अली (रा. तांबापुरा जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

रामानंद नगर पोलिस स्टेशनला दाखल चोरीच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी तथा रेकॉर्डवरील गुन्हेगार इस्तीयाक अली राजीक अली हा तांबापुर परिसरातील शामा फायर वर्क्स नजीक असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकाला त्याच्या शोधार्थ अटक करण्याकामी रवाना केले होते.

पोलिस हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, विजय शामराव पाटील प्रीतम पाटील, अविनाश देवरे आदींच्या पथकाने तांबापुर परिसरात जावून त्याला शिताफीने ताब्यात घेत अटक केली. आपल्या साथीदाराच्या मदतीने आपण गुन्हा केल्याचे त्याने कबुल केले आहे. पुढील तपासकामी त्याला रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here