फारुख शेख यांना सत्र न्यायालयाचा तात्पुरता जामीन

जळगाव : कोविड कालावधीत मुस्लिम बांधवांच्या दफनविधी रकमेप्रकरणी दाखल फसवणूकीच्यागुन्ह्यात फारुख शेख यांना जळगाव सत्र न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. फारुख शेख हे जळगाव मुस्लिम इदगाह व कब्रस्थान ट्रस्टचे सचिव आहेत. कोविड कालावधीत मृत पावलेल्या 111 मुस्लिम बांधवांच्या दफनविधीसाठी प्रत्येकी 1750 रुपये याप्रमाणे होणा-या रकमेतून कर वजा जाता महानगरपालीकेकडून 1 लाख 86 हजार 480 रुपये ट्रस्टच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. मृतकांच्या नातेवाईकांकडून नाममात्र शंभर रुपये घेतल्यानंतर स्वखर्चाने दफनविधीचा खर्च केला जात असतो. असे असतांना फारुख शेख यांनी केलेल्या पत्रव्यवहारानुसार हा निधी जळगाव मनपाकडून ट्रस्टच्या खात्यावर जमा झाल्याचा आरोप आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर फारुख शेख यांनी जळगाव सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अ‍ॅड. प्रकाश बी. पाटील यांच्यामार्फत अर्ज दाखल केला. न्या. व्ही.बी.बोहरा यांच्या न्यायालयात या प्रकरणी कामकाज चालले. सादर केलेली सर्व कागदपत्रे आणि अ‍ॅड. प्रकाश पाटील यांचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने फारुख शेख यांना तात्पुरता अंतरीम जामीन मंजुर करत त्यांना दिलासा दिला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here