बनावट हमीपत्राद्वारे तिघांनी केली साडेतीन कोटींची फसवणूक

fraud image

नाशिक : आडगाव शिवारातील प्लॉटचे खोटे हमी व संमतीपत्र तयार करुन तीन कोटी 48 लाख 90 हजार रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक आडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीनीचे खोटे हमीपत्र तसेच बांधकाम विकास आराखडा बेकायदेशीर तयार करुन कायदेशीर वारसदारांना रस्ता चौपदरीकरण भूसंपादनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या रक्कमेवर अनाधिकारे ही कोट्यावधीची रक्कम स्विकारुन अपहार करण्याचा हा प्रकार झाला. या आर्थिक फसवणूक प्रकरणी सिडकोतील रहिवासी तिघा संशयित आरोपींवर आडगाव पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल झाला आहे.

सारडा सर्कल येथील रहिवासी इस्लाम इकबाल खान यांनी सदर गुन्हा दाखल केला आहे. सिडको येथील संशयित आरोपी अफजल अख्तर खान, शब्दात अफजल खान व शफी नूर मोहम्मद खान यांनी संगनमताने जुलै 2014 ते डिसेंबर 2018 या दरम्यान गट नंबर 670 सर्वे नंबर 141 नाशिक मनपाच्या आडगाव शिवारातील फिर्यादीच्या एकूण क्षेत्र 22 आर मिळकतीच्या विकास करारावर फिर्यादी व त्याचे वडील यांना रस्ता भूसंपादन माध्यमातून मिळणारी रक्कम स्विकारून बनावट कागदपत्र संमती पत्राच्या माध्यमातून बांधकाम विकास आराखड्यात बेकायदा बदल करत फसवणूक केली. हा प्रकार फिर्यादीच्या लक्षात आल्यावर त्यांनी आडगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संजय बिडकर तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here