अल्पवयीन मुलीवर अत्याचार – तरुणाला वीस वर्ष कारावास 

जळगाव : अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना तिच्या तोंडात बोळा कोंबून लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला विशेष पोक्सो न्यायाधिश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांनी शनिवारी २० वर्ष सश्रम कारावास व ४५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तालुक्यातील एका गावात राहणारी अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना दीपक सुभाष पवार (भिल, वय २५) याने मे व जून २०२१ दरम्यान घरात घुसून मुलीवर अत्याचार केला होता. त्यांत त्या मुलीला गर्भधारणा झाली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची

सुनावणी विशेष पोक्सो न्यायालयात झाली. त्यात फिर्यादी मुलगीच फितूर झाली. सरकारी पक्षाने एकूण १३ साक्षीदार तपासले. त्यात फिर्यादीची आई व डॉक्टरांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. न्यायालयाने पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ अन्वये प्रत्येकी २० वर्ष सश्रम कारवास व २० हजार रुपये दंड, तो न भरल्यास चार वर्ष सश्रम कारावास, भादंवि कलम ५०६ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास व व पाच हजार रुपये दंडांची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता महेंद्र फुलपगारे यांनी काम पाहले. तसेच पैरवी अधिकारी विजय पाटील व तपासी अधिकारी अमोल मोरे यांनी सहाय्य केले. मूळ फिर्यादीतर्फे शारदा सोनवणे यांनी कामकाज पाहिले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here