डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला आदेश; टिकटॉकची अमेरिकेतील संपत्ती विका

donald tramp


वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी कंपनी बाइटडान्सला टिकटॉक अ‍ॅपचा अमेरिकेतील सर्व व्यवसाय विकण्याचा आदेश दिला आहे. त्यासाठी कंपनीला ९० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

गेल्याच आठवड्यात ट्रम्प यांनी टिकटॉक आणि वुईचॅटच्या मालकांसोबत करार करण्यास बंदी घातली होती. दोन्ही कंपन्यांमुळे अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षितता, अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरणाला धोका निर्णाण होण्याची शक्यता असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. टिकटॉकसंदर्भात ट्रम्प यांनी दिलेल्या आदेशाचा नेमका काय अर्थ आहे हे अजून नेमके स्पष्ट होवू शकले नाही. अमेरिकेत १० कोटी नागरिक या अ‍ॅपचा वापर करत आहेत.

अमेरिकेतील टिकटॉकचा व्यवसाय विकत घेण्यासाठी मायक्रोसॉफ्टसोबत बोलणी सुरु आहे. मायक्रोस्फॉट किंवा अन्य कुठलीही कंपनी अमेरिकेतील टिकटॉकचा व्यवसाय सुरु करण्यास असफल ठरली तर मात्र १५ सप्टेंबरपासून टिकटॉकवर बंदी घातली जाण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. डाटा जमा केल्यामुळे चीनमधील कम्युनिस्ट पक्षाला अमेरिकी नागरिकांची खासगी माहिती मिळत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. या खासगी माहितीच्या आधारे चीन ब्लॅकमेल करण्यासाठी गैरवापर करु शकते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here