तेरा वर्षाच्या बालिकेची अत्याचारानंतर हत्या

काल्पनिक छायाचित्र

लखनौ : उत्तरप्रदेशच्या लखीमपुर खिरी जिल्हयात एक खळबळजनक घटना घडली आहे. तेरा वर्षाच्या एका मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्याचा प्रकार घडला.
शनिवारी या मुलीचे शव पोलीसांना मिळून आले. शुक्रवारी घडलेल्या या घटनेप्रकरणी दोघा संशयीतांना अटक करण्यात आली आहे. हत्या झालेल्या मुलीचे डोळे फोडण्यासह तीची जीभ देखील कापल्याचा दावा तिच्या वडीलांनी केला आहे.

लखनौपासून सुमारे 130 किलोमीटर अंतरावरील हे गाव नेपाळच्या हद्दीवर वसलेले आहे. आज या मुलीच्या हत्येप्रकरणी शव विच्छेदन अहवाल आला. मयत मुलीच्या वडीलांनी केलेल्या दाव्यानुसार मुलीचे डोळे फोडून जीभ कापल्याचा प्रकार झाला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शव विच्छेदनात केवळ बलात्कार व गळा आवळण्याचा उल्लेख नमुद आहे.

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी या घटनेप्रकरणी राजकीय दृष्टीकोनातून जोरदार टीकाटिपणी केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की लखीमपूर खिरी येथील दलीत अल्पवयीन मुलीवर हा छळ व खूनाची घटना वेदनादायी आहे. सपा आणि भाजपा सरकारमधे कुठलाही फरक राहिलेला नाही. सरकारने दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here