शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात

जळगाव : शिवसेना सस्थापक तथा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना शाखा बोराळे ता. यावलतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सुरुवातीला शिवसेना शाखा प्रमुख भरतसिंग राजपूत यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पन केले. शाखा सचिव प्रदीप वानखेडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपशाखा प्रमुख तुषार राजपूत, शाखा संघटक अमीत राजपूत यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत शाखा प्रमुख भरतसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे उमेदवार व सरपंच अशी एकहाती सत्ता स्थापन करण्यात येणार असल्याचे अमित राजपूत यांनी म्हटले. आभार माजी ग्रामपंचायत सदस्य मोना राजपूत यांनी मानले. कार्यक्रमाला बोराळे ग्रा.पं. सदस्य रवींद्र वानखेडे, सुहास वानखेडे, लखन राजपूत, दिपक वानखेडे, नेमीचंद पाटील, हिंमतसिंग राजपूत, सुमित राजपूत, पूनमसिंग राजपूत, विनोद चौधरी, विनोद चौहान, कल्पेश राजपूत तसेच सर्व शिवसैनिक व पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी, माजी सरपंच,  माजी ग्रामपंचायत सदस्य, विकासो संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here