रॉकीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

रॉकी

बीड : गुन्हयाच्या तपासकामात श्वानपथकाची भुमीका मोलाची असते. श्वान पथकातील एखादा महत्वाचा श्वान ज्यावेळी हे जग सोडून जातो त्यावेळी पोलिस दलाला नक्कीच दुख: होत असते. बीड जिल्हा पोलिस दलातील “रॉकी” नावाच्या अनुभवी आणि प्रामाणीक श्वानाचे काल स्वातंत्र्य दिनी दुख:द निधन झाले. बीड पोलिस दलातर्फे “रॉकी” वर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

रॉकी” या अनुभवी श्वानाने आजतागायत सुमारे 365 गुन्हे उघड करण्याकामी मोलाची भुमीका बजावली आहे. त्याच्या जाण्याने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट द्वारे आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. बीड पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा एक प्रामाणिक योद्धा रॉकीच्या जाण्याने गमावला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बॉंम्ब शोध पथक, दहशतवादी हल्ले यासह विविध किचकट गुन्हयांची उकल करण्यात रॉकीचा हातखंडा होता. त्यामुळे बीड पोलिसांची मान गौरवाने उंचावली होती. स्त्री भृण हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा बदनामीच्या जाळ्यात अडकला होता. स्त्री भृण हत्या प्रकरणी अर्भक टाकलेल्या जागेवर रॉकीचा सहभाग असलेल्या श्वान पथकानेच पोलिसांना पोहोचविले होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here