रेल्वेतून पडलेल्या तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन

जळगाव : रेल्वे अपघातात जखमी होवून मयत झालेल्या अनोळखी तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 6 फेब्रुवारी 2023 रोजी हा अनोळखी तरुण जळगाव शहरातून जाणा-या शिव कॉलनी रेल्वे पुलानजीक जळगाव ते शिरसोली दरम्यान अप रेल्वे लाईनवर आढळून आला आहे. या अनोळखी तरुणाचे अंदाजे वय 25 ते 30 वयोगटातील आहे.

या तरुणाच्या अकस्मात मृत्यूप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला सीआरपीसी कलम 174 नुसार 10/2023 या क्रमांकाने नोंद घेण्यात आली आहे. मयत तरुणाच्या अंगात काळ्या रंगाची फुल पॅन्ट असून तिच्या आतील बाजूस कमरेवर CWC COLOUR WISE COTTON, CWC FUTURE IS NOW असा मजकूर आहे.  तपकिरी रंगाच्या अंडरपॅन्टवर ESSA EXODA 85 CM असे लिहिले आहे. तसेच पांढरा बनियान त्यावर QUCO PREMIUM, FULL OF Attitude असे लेबल असलेले हिरव्या रंगाचे गोल गळ्याचे हाफ बाह्यांचे टी-शर्ट आहे. टी शर्टच्या पुढील बाजूस Stroke व रणगाड्याचे चित्र छापलेले आहे. HELIOS लोगो असलेला XXL भगव्या/केसरी रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट व पुन्हा त्यावर HELIOS लोगो असलेला XXL ग्रे रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट घातलेला आहे.  पायात काळ्या रंगाचे सॉक्स व  पांढऱ्या रंगाचे बुट त्यावर 666 असे छापलेले अशा वर्णनाचा इसम मयत झाला आहे.

मयताच्या पॅंटच्या खिशात शेगाव ते भुसावळ दरम्यान 5 फेब्रुवारीचे रेल्वे प्रवासाचे तिकीटदेखील आढळून आले आहे. या अनोळखी तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या तरुणाबाबत कुणाला काही माहिती समजल्यास रामानंद नगर  पोलिस स्टेशनचे तपासी अंमलदार पोलिस नाईक जितेंद्र तावडे (मोबाईल नंबर 7738341022) अथवा रामानंद नगर पोलिस स्टेशन (फोन नं. 0257-2282864) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here