गोळीबाराचा इरादा नेस्तनाबूत – न्यायालय परिसरातून बुरखाधारी इसम पिस्टलसह ताब्यात  

जळगाव : खून का बदला खून या सुडबुद्धीने सन 2021 मधे जळगाव नजीक नशिराबाद उड्डाणपुलाखाली एक खूनी हल्ला झाला होता. त्यावेळी त्या हल्ल्यात तरुणाची हत्या झाली होती. त्या हत्येचा बदला घेण्याच्या इराद्याने जळगाव न्यायालय परिसरात बुरखा परिधान करुन आलेल्या दोघांपैकी एकाला जळगाव शहर पोलिसांच्या पथकाने पकडण्यात यश मिळवले आहे. सुडभावनेतून “दयावान” चित्रपटात दाखवण्यात आलेली साजेशी खूनाची घटना पोलिसांच्या सतर्कतेने टळली आहे. मनोहर आत्माराम सुरळकर असे पाच जीवंत काडतुस आणि गावठी पिस्टलसह अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.

दिनांक 21 सप्टेबर 2021 रोजी नशिराबाद उड्डालपुलाच्या खाली खूनाची घटना घडली होती. या घटनेत धम्मप्रिया सुरळकर हा तरुण गोळीबारात ठार झाला होता. त्याचे वडील मनोहर सुरळकर धारदार शस्त्राच्या हल्ल्यात जखमी झाले होते. या घटनेच्या दिवशी मयत तरुण धम्मप्रिया सुरळकर याचा वाढदिवस होता आणि याच दिवशी तो खूनाच्या गुन्ह्यातून जामीनावर बाहेर आला  होता. त्याला भुसावळ येथे नेत असतांनाच त्याची हत्या झाली होती.  

tejas marathe police constable

पुर्ववैमनस्याची किनार असलेल्या या घटनेला अनुसरुन बदल्याच्या भावनेतून मनोहर सुरळकर आणि त्यांच्यासोबत सुरेश रवी इंधाटे असे दोघेजण मुस्लीम महिला परिधान करत असलेला बुरखा घालून न्यायालयात आले होते. सतर्कता बाळगत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तेजस मराठे, योगेश इंधाटे, गजानन बडगुजर, उमेश भांडारकर, शहर वाहतूक शाखेचे परमेश्वर जाधव आदींच्या पथकाने मनोहर सुरळकर याला ताब्यात घेतले आहे. मात्र झालेल्या झटापटीदरम्यान सुरेश इंधाटे हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे. पोलिस पथक त्याच्या मागावर आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा कायदेशीर प्रक्रिया शहर पोलिस स्टेशनला सुरु होती.

धम्मप्रिय सुरळकर हा कैफ नावाच्या तरुणाच्या खूनप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात संशयीत आरोपी होता. त्या खूनाच्या गुन्ह्यात 21 सप्टेबर 2021 रोजी त्याचा जामीन न्यायालयाने मंजुर केला होता. जामीन मंजुर झाल्याबाबतचे कागदपत्र घेऊन त्याचे वडील मनोहर सुरळकर व तिघे असे चौघेजण जळगाव उप कारागृहात पोहोचले होते. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास धम्मप्रियची न्यायालयातून जामीनावर सुटका झाली. सायंकाळी चौघे जण धम्मप्रियला सोबत घेत जळगावहून भुसावळच्या दिशेने दोन मोटारसायकने घराकडे निघाले होते. एका मोटार सायकलवर दोघे तर दुस-या मोटार सायकलवर तिघे असे पाच जण भुसावळकडे मार्गक्रमण करत होते. वाटेत नशिराबाद गावानजीक पुलाखाली सर्वजण सिगारेट ओढण्यासाठी थांबले. त्याच वेळी काही कळण्याच्या आत पलीकडून काही जण त्यांच्या दिशेने मोटार सायकलवर चाल करुन आले होते.

आलेल्या तरुणांनी धम्मप्रिय व त्याच्या वडीलांच्या डोळ्यात मिरचीची पुड फेकली. डोळ्यात मिरचीची पुड फेकल्यामुळे दोघांचे डोळे चुरचुर करण्यास लागले. कुणालाच काही समजत नव्हते. दरम्यान दोघांनी पिस्टलने गोळीबार सुरु केला. या गोळीबारात धम्मप्रियच्या छातीत व डोक्यात गोळी लागली. जिव वाचवण्यासाठी तो काही अंतर पळाला मात्र त्याला पळून जाण्याची संधी देण्यात आली नाही. हल्लेखोर तरुणांनी त्याच्यासह त्याचे वडील मनोहर सुरळकर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात धम्मप्रिय जागीच ठार झाला तर त्याचे वडील जखमी झाले होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here