मदत मिळाली अभियंत्यासह डॉक्टरांची, प्राण वाचले पोलिसाचे

जळगाव : कोण म्हणतो देव नाही, या जगात मानवाच्या रुपात देव आहे म्हणूनच जगाचा रहाटगाडा सुरळीतपणे सुरु आहे…… हे बोल आहेत काही दिवसांपुर्वी महामार्गावर रस्ता अपघातातून बचावलेले सहायक फौजदार राजेंद्र उगले यांचे. सहायक फौजदार राजेंद्र उगले हे एमआयडीसी पोलिस स्टेशनला कार्यरत असून काही दिवसांपुर्वी ते एका रस्ता अपघातातून बालबाल बचावले आहेत. सहायक फौजदार राजेंद्र उगले सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.   

7 फेब्रुवारी 2023 रोजी ड्युटी आटोपून राजेंद्र उगले हे आपल्या ताब्यातील मोटार सायकलने एका मित्रासमवेत महामार्गाने घरी जात होते. दरम्यान रात्री दहा वाजेच्या सुमारास जळगाव धुळे महामार्गावरील वाटिकाश्रम नजीक एका पांढ-या रंगाच्या कार चालकाने ओव्हरटेक करत त्यांच्या मोटार सायकलला कट मारला. अनोळखी कारचालकाने कट मारल्यामुळे सहायक फौजदार उगले व त्यांचा मित्र असे दोघे महामार्गावर मोटार सायकलसह खाली कोसळले. मोटार सायकलला धडक देत घटनास्थळावरुन पलायन करणा-या कारचा पत्रा पायात घुसून सहायक फौजदार उगले यांच्या पायाचा पंजा जखमी झाला. पायाच्या पंजाचा पार चेंदामेंदा झाला होता. याशिवाय हाताला इजा झाल्यामुळे हात देखील बधीर झाला.

उगले यांना धडक देणारी कार घटनास्थळावर न थांबता भरधाव वेगात निघून गेली होती. त्याच वेळी जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त अभियंता मोरे हे आपल्या खासगी चारचाकी वाहनाने तेथून मार्गक्रमण करत होते. त्यांनी अपघाताची घटना बघून आपल्या ताब्यातील कार थांबवून मदतकार्य सुरु केले. दरम्यान उगले यांचे काही मित्र मागून आले. त्यांच्या मदतीने जखमी उगले यांना मोरे यांच्या कारमधे टाकण्यात आले. सेवानिवृत्त अभियंता मोरे यांनी जखमी अवस्थेतील उगले यांना काही दवाखान्यात उपचारार्थ नेले. त्यानंतर रिंगरोड स्थित डॉ. परिक्षीत बाविस्कर यांच्या अरुश्री हॉस्पीटलमधे दाखल करण्यात आले. या अपघाताशी कुठलाही संबंध नसतांना जिल्हापरिषदेचे सेवानिवृत्त अभियंता मोरे यांनी उगले यांच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च करण्याची तयारी दर्शवली. मात्र उगले यांनी त्यांचे मनापासून आभार मानत नम्रपणे वैद्यकीय उपचाराच्या आर्थिक मदतीस नकार दिला.

Dr. parikshit baviskar

सहायक फौजदार राजेंद्र उगले यांच्या पंजाची त्वचा नसांपासून सोलून निघाली होती. मांडीची मजबूत त्वचा काही प्रमाणात काढून ती पंजा दुरुस्तीसाठी वापरण्यात आली. यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. वेळीच उपचार मिळाल्याने शरिरातून बाहेर सुरु असलेला रक्तप्रवाह थांबून उगले यांचा जीव वाचवण्याकामी अभियंता मोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अभियंता मोरे यांच्यासह उगले यांच्या रहिवासी सोसायटीतील मित्रांनी देखील मदतीसाठी धाव घेतली. कमी वेळेत जखमी उगले यांना चांगला उपचार मिळाला. त्याबद्दल त्यांनी डॉ. परिक्षीत बाविस्कर यांचे देखील आभार मानले आहेत.

सहायक फौजदार राजेंद्र उगले यांनी आपली व्यथा क्राईम दुनियासोबत बोलतांना व्यक्त केली. ते म्हणाले की परमेश्वर सर्वव्यापी असून तो मनुष्याच्या रुपातून मनुष्याच्या मदतीला धावून जात असतो. आपल्या तिस वर्षाच्या पोलिस दलातील सेवाकाळात आपण  अनेक अपघात पाहिले आहेत. विविध अपघातात केवळ वेळेवर उपचार न मिळाल्याने अपघातग्रस्त व्यक्तीचे निधन होत असते. अपघातात कुणी आपला महत्वाचा अवयवा गमावत असतो. आपले काहीतरी सत्कर्म आपल्या मदतीला आल्याची भावना उगले यांनी बोलतांना व्यक्त केली. 

ज्याठिकाणी आपला अपघात घडला त्याठिकाणी समोरुन अथवा मागून सुदैवाने कोणतेही अवजड वाहन आले नाही. एखादे अवजड वाहन आले असते तर कदाचीत आपल्या जीवाचे काहीतरी बरेवाईट देखील झाले असते. मात्र परमेश्वराला आपल्याबाबतीत केवळ अपघाताशिवाय दुसरी घटना मान्य नसावी. त्यामुळेच मला मानवरुपी तात्काळ मदत मिळाली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here