बनावट नोटांसह त्या तयार करण्याच्या साहित्यासह एकास अटक  

जळगाव : बनावट नोटा तयार करण्याच्या साहित्यासह एका जणास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवीदास पुंडलीक आढाव (रा. कुसुंबा जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. त्याच्या कब्जातून बनावट नोटा तयार करण्याच्या साहित्यासह सुमारे 45 हजाराच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

एक व्यक्ती बनावट नोटांची छपाई करुन विक्री करत असल्याची गोपनीय माहिती चोपडा उप विभागीय कार्यालयातील पोलिस नाईक राहुल सिद्धार्थ बैसाने यांना समजली होती. पोलिस नाईक राहुल बैसाने यांनी ही माहिती जळगाव उप विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांना दिली. त्या माहितीच्या आधारे पुढील कारवाई करण्यात आली. या पंटर केसप्रकरणी पो.कॉ. सचिन सुरेश साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उप निरीक्षक निलेश गोसावी करत आहेत.   

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here