तरुणीच्या छेडखानीसह तिच्या पतीला मारहाण – तिघांना अटक

जळगाव : विवाहीत तरुणीची छेडखानी करत तिच्या पतीला मारहणा करणा-या चौघांपैकी तिघांना अमळनेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. विवाहीत तरुणीची छेडखानी करणा-या टवाळखोरांनी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी मुलीसह तिच्या पतीवर दबाव आणण्याचा प्रयत्न पोलिसांच्या प्रयत्नाने हाणून पाडण्यात आला. या घटनेमुळे अमळनेर शहरात खळबळ माजली असली तरी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत देखील होत आहे. मात्र असे गंभीर प्रकार अमळनेर शहरात यापुढे खपू दिले जाणार नाही अशी प्रतिक्रिया अमळनेर पोलिस स्टेशनचे पो.नि. विजय शिंदे यांनी “क्राईम दुनिया” ला दिली आहे.

VIJAY SHINDE POLICE INSPECTOR

याबाबत सविस्तर वृत्त असे की अमळनेर तालुक्यातील एक विवाहीत तरुणी शैक्षणीक कामकाजानिमित्त 3 मार्च रोजी एन.टी. मुंदडा महाविद्यालयात आली होती. महाविद्यालयाच्या गेटच्या बाहेर पायी जात असतांना तिच्या पाठीमागून चार तरुण तिचा पाठलाग करत आले. त्यापैकी अनिरुद्ध उर्फ मोन्या अर्जुन चंडाले याने तिला अश्लिल शब्दात हाक मारुन तिच्या डाव्या खांद्यावर हात ठेवत तिच्या केसांना स्पर्श केला. चंद्रकांत राजेंद्र पाटील, अविनाश अर्जुन चंडाले, मोन्याचा भाऊ अशा तिघांनी “पकड तिला” असे म्हणत अनिरुद्ध यास आवेशीत केले. आपल्या पत्नीचा विनयभंग होत असल्याचे बघून तिचा पती तिच्या मदतीसाठी आला. मात्र चौघांही मिळून त्याच्या पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे ठार करण्याची त्याला धमकी दिली.  

या घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी तातडीने आपले सहकारी पुढील कारवाईकामी रवाना केले. चौघांविरुद्ध विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्य आरोपी अनिरुद्ध याच्यासह एकुण तिघांना अटक करण्यात आली आहे. तक्रारदार मुलीवर गैरदबाव आणून प्रकरण दाखल होवू न देण्याचा प्रयत्न अमळनेर पोलीसांनी यशस्वी होवू दिला नाही. गंभीर गुन्हा दाखल करुन टवाळखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारांच्या मनात अमळनेर पोलीसांची यापूर्वी असलेली दहशत अद्याप कायम असल्याचे पो.नि. विजय शिंदे यांच्या कारवाईमुळे दिसून आली आहे. अशा प्रकारच्या घटनांना यापुढे अजिबात थारावारा दिला जाणार नसल्याचे देखील पो.नि. विजय शिंदे यांनी पुढे बोलतांना म्हटले आहे. अमळनेर शहर आणी तालुक्यातील गुन्हेगारांनी हा इशारा समजावा असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. अमळनेर पोलिस स्टेशनचे पो.नि. विजय शिंदे यांच्या पथकातील पोलिस उप निरिक्षक विकास शिरोळे, सहायक फौजदार संजय पाटील, हे.कॉ. किशोर पाटील, पोना शरद पाटील, दिपक माळी, रवि पाटील, सिद्धांत सिसोदे, नम्रता जरे व चालक सुनिल पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here