एलसीबीसह रावेर पोलिसांची जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई

जळगाव : एलसीबी जळगाव आणि रावेर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने छापेमारी करुन रावेर तालुक्यातील मोरगाव येथे जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली आहे. आज भल्या पहाटे चार वाजेच्या सुमारास केलेल्या या कारवाईत जागा मालकासह सतरापेक्षा अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे जुगार अड्डा चालकांमधे मोठी खळबळ माजली आहे. एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा पकडण्यात आलेल्यांमधे समावेश असून या कारवाईमुळे चर्चेला उधान आले आहे.  

संदिप दिनकरराव देशमुख (रा. पुर्णाड ता. मुक्ताईनगर – जुगार अड्ड्डा मालक, संजय दर्शन गुप्ता (रा. लालबाग बऱ्हाणपुर म.प्र.), शांताराम जिवराम मंगळकर रा. लालबाग बऱ्हाणपुर म.प्र., समाधान काशिनाथ कोळी रा.सांगवा ता. रावेर, कासम महेबुब तडवी रा. पिंप्री ता. रावेर, जितेंद्र सुभाष पाटील रा. विवरा ता. रावेर, कैलास नारायण भोई रा. भोईवाडा, रावेर, मनोज दत्तु पाटील रा. पिंप्रीनादु ता. मुक्ताईनगर, मनोज अनाराम सोळंखे रा. आलमगंज बऱ्हाणपूर म.प्र., सुधिर गोपालदास तुलसानी रा. इद्रनगर, बऱ्हाणपूर म.प्र., रविंद्र काशिनाथ महाजन रा. वाघोदा ता. रावेर, बापु मका ठेलारी रा. पुर्णाड ता. मुक्ताईनगर, राजु सुकदेव काळे रा. प्रतापपुरा बु-हाणपूर म.प्र., युवराज चिंधु ठाकरे रा. महालक्ष्मी मंदिरा जवळ रावेर, सोपान एकनाथ महाजन रा. डापोरा अडगाव ता. ब-हाणपूर म.प्र., छोटया (पूर्ण नाव माहित नाही.), प्रल्हाद पुंडलीक पाटील रा. मोरगाव ता. रावेर (जागा मालक) व इतर दोन ते तीन इसम असे लोक 52 पत्त्याच्या कॅटवर झन्ना मन्ना मांग पत्ता जुगाराचा खेळ खेळतांना व खेळवतांना मिळून आले आहेत. पत्ता जुगाराची साधने, रोख रुपये 1 लाख 46 हजार 940 रुपये, 8 चार चाकी वाहने, 6 मोटार सायकलसह एकूण 55 लाख 46 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रावेर पो.स्टे.ला गु.र.न. 75/23  महा. जुगार प्रति. का. क. 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगार अड्डा मालक संदिप दिनकरराव देशमुख हा पुर्वी पुर्णाड ता. मुक्ताईनगर येथे जुगार अडडा चालवत होता.

रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत मोरगाव येथील सदगुरु बैठक हॉलच्या बाजुस प्रल्हाद पुंडलीक पाटील रा. मोरगाव हे जागा मालक त्यांच्या घराच्या वॉल कंम्पाऊंडमध्ये स्वतःच्या फायदयासाठी काही लोकांसह झन्ना मन्ना नावाचा पत्ता जुगाराचा खेळ खेळत खेळवत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले पथक रवाना केले होते.

पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या अधिपत्याखाली पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे, सहायक फौजदार रवी पंढरीनाथ नरवाडे, सहायक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ कमलाकर भालचंद्र बागुल, महेश आत्माराम महाजन, पोना संतोष रामस्वामी मायकल, पोना किरण मोहन धनगर, पोना श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, चापोहेकॉ भारत शांताराम पाटील, चापोना प्रमोद शिवाजी ठाकुर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. याशिवाय रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या अधिपत्याखाली पोलिस उप निरीक्षक बाळासाहेब नवले, पोकॉ. समाधान कौतिक ठाकुर, पोकॉ. विशाल शिवाजी पाटील, पोकॉ. प्रमोद सुभाष पाटील, सचिन रघुनाथ घुगे आदींनी एलसीबी पथकाला सहकार्य केले. 

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here