जैन तंत्रज्ञान नफ्याची शेतीसाठी खूपच उपयुक्त – अमोस लुगोलुभी

जळगाव दि.११ प्रतिनिधी –  जगभर शेती उपयुक्त तंत्रज्ञान व त्यावर आधारीत शेती बघितली, मात्र जैन हिल्सवरील तंत्रज्ञान वापरून विकसीत केलेली शेती ही शेतकऱ्यांसाठी खूपच नफ्याची आहे. कारण अचुक व्यवस्थापनामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनात वाढल्याचे येथे उदाहरण आहे. यासाठी जैन इरिगेशनच्या तंत्रज्ञानावर आधारित शेतीकडे वळले पाहिजे असे महत्त्वपूर्ण विधान युंगाडा येथील अर्थमंत्री अमोस लुगोलुभी यांनी केले.

 जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर देशभरातून शेतकरी भेटी देत आहेत गेल्या ५ फेब्रुवारी ते १५ मार्च दरम्यान शेतकरी अभ्यास दौरामध्ये अमोस लुगोलुभी यांनी सहभागी झाले. आणि शेतीउपयुक्त तंत्रज्ञान समजून घेतले. याप्रसंगी त्यांसोबत युगांडा येथील मौसेम मोहुमूझा, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, एस. आर. बाला उपस्थित होते.

यावेळी राज्यभरातील महिला शेतकरी अभ्यासाठी जैन हिल्स येत असल्याचे अमोस लुगोलुभी यांनी आश्चर्य व्यक्त केले. जैन हिल्सच्या संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर ८२ प्रकारच्या कांद्याची लागवड त्यांनी बघितली. लागवड पद्धतीमधील बदल, गादी वाफेचा वापर, एकात्मीक कीड रोग व्यवस्थापन, ठिबक व सूक्ष्मसिंचनातून फर्टिगेशन, जैन ऑटोमेशन यातून कांदा लागवडीचे उत्पादन यावर त्यांनी प्रकाश टाकला. जैन इरिगेशनच्या या अत्याधुनिक तंत्रज्ञानातून कांद्या लागवड यशस्वी झाली. जैन हिल्सवरील प्रत्येक जातीचा कांदा हा एकसमान आणि त्याची आकाराने वाढही उत्तम असून ते प्रक्रिया उद्योगासाठी उपयूक्त असल्याचे ते म्हणाले.

जैन इरिगेशनने शेतकऱ्यांसाठी प्रात्याक्षिकातून मार्गदर्शन उपलब्ध करून दिल्याने सकारात्मक बदल होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. यातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल परिणामी शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन समृद्ध होईल असेही युंगाडाचे अर्थमंत्री अमोस लुगोलुभी म्हणाले. यावेळी त्यांनी जैन फार्मफ्रेश फूड्च्या प्रक्रिया उद्योगालाही भेट देऊन मसाल्यांवर होणारी प्रक्रिया समजून घेतली. प्लास्टीक पार्क आणि एनर्जी पार्कच्या सोलर सह भविष्यातील शेती म्हणजे फ्युचर फार्मिंग ही समजून घेतली. कमी वेळेत कमी जागेत जास्तीत जास्त व्हायरस फ्री उत्पादन कसे घेता येईल, हे त्यांनी बघितले आणि जैन इरिगेशनचे हे तंत्रज्ञान जगातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असेही ते म्हणाले. 

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here