अभ्यास दौ-याचा अहवाल मनियार बिरादरीतर्फे सादर ; जळगावकरांसाठी योग्य कार्यवाही करु – महापौर

nivedan

जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत  मुस्लिम इदगाह कब्रस्तानाच्या ठिकाणी कोरोना बाधीत मृतांचे दफन विधी करणारे शब्‍बीर पटेल, अनिस शाह व इसाक बागवान यांना तात्पुरते  मानसेवी कर्मचारी म्हणून नियुक्ती देण्याची मागणी मनियार बिरादरीतर्फे महापौरांना करण्यात आली आहे. त्यांना व त्यांच्या परिवाराला कोरोनाचे सुरक्षा कवच या माध्यमातून मिळेल. मालेगाव महानगरपालिकेने ज्याप्रमाणे सामाजिक संघटनेसोबत मिळून तेथील जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांसोबत कार्य केले आहे. त्यामुळे कोरोना संक्रमित ८०० रुग्णापासून संख्या कमी होत आज ८० रुग्णापर्यंत पोहोचली आहे. जळगाव शहर मनपाने शहरातील मुफ़्ती अतीक, फारूक शेख,नदीम काज़ी, अनीस शाह व डॉ जावेद यांनी अभ्यास  अभ्यास दौरा करून जो अहवाल तयार केला आहे तो सुद्धा महापौरांना सादर करण्यात आला. या अहवालावर त्वरित योग्य ती कार्यवाही करावी अशा दोन मागण्यांचे निवेदन महापौरांना मनियार बिरादरीतर्फे देण्यात आले.

सदर निवेदन मनियार बिरादरीचे शहराध्यक्ष सय्यद चाँद सय्यद अमीर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष फारुक शेख, इदगाह ट्रस्ट चे सहसचिव अनिस शाह, सिकलगर बिरादरी व रोशनी मल्टीपर्पज फाउंडेशनचे अन्वर खान व  जुलकर नैन आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना महापौर भारतीताई सोनवणे यांनी म्हटले की आपण निश्चितच जळगावकरांसाठी या  कोरोनासारख्या आजारापासून सुटका होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य व मदत करू. कोरोना सारख्या मृत व्यक्तीला दफनविधी करणाऱ्यांना सुद्धा योग्य ते सुरक्षा कवच उपलब्ध करून देऊ असे आश्वासन महापौरांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here