खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस चोवीस तासात अटक

जळगाव : पहूर – जामनेर दरम्यान सोनाळा फाट्यानजीक झालेल्या तरुणाच्या खूनातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चोवीस तासात जेरबंद केले आहे. या घटने प्रकरणी पहुर पोलिस स्टेशनला गु.र.न. 81/23 भा.द.वि. 302 नुसार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील मयताची ओळख पटली असून संशयीत आरोपी देखील निष्पन्न झाला आहे.  

प्रमोद उर्फ बाळु भगवान वाघ (रा. शिंगाईत ता. जामनेर) असे मयताचे नाव आहे. घटनास्थळासह परिसरातील रहिवाशांकडून मयताची ओळख पटण्यात यश आले. गोपनीय माहितीसह तांत्रीक विश्लेषणाच्या माध्यमातून मयत रहात असलेल्या गावातीलच संशयीत बाळू हडप याला ताब्यात घेण्यात आले. बाळू हडप याने दिलेल्या माहितीनुसार पैशांच्या देवाणघेवाणीतून हा खून झाल्याचे उघडकीस आले आहे.  

21 मार्च 2023 रोजी मयत प्रमोद उर्फ बाळू भगवान वाघ आणि संशयीत आरोपी बाळू हडप असे दोघे सोबत होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास दोघांमधे आर्थिक देवाणघेवाणीतून वाद झाला. या वादादरम्यान मयत प्रमोद वाघ याने संशयीत आरोपी बाळू हडप यास काठीने कमरेवर मारहाण केली होती. या मारहाणीचा राग आल्याने बाळू हडप याने प्रमोद वाघ याच्या डोक्यात दगडाचे घाव घातले. दोन वेळा दगडाने मारलेल्या घावात प्रमोदच्या डोक्यातूनआणि कानातून रक्त वाहू लागले. त्यात तो मरण पावला. प्रमोद वाघ मरण पावल्याचे लक्षात आल्यानंतर बाळू हडप याने त्याचे पाय ओढत ओढत त्याला ज्वारीच्या शेतातील पिकाच्या आडोशाला आणून सोडून दिले.  त्याची मोटार सायकल आणि मोबाईल घेतल्यानंतर बाळू हडप तेथून निघून गेला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किसनराव नजनपाटील यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक  गणेश वाघमारे, सहायक फौजदार युनुस शेख, हे.कॉ. महेश महाजन, लक्ष्मण पाटील, संदिप सावळे, किशोर राठोड, रणजीत जाधव, सचिन महाजन, ईश्वर पाटील, लोकेश माळी, चालक सफौ. रमेश जाधव आदिंनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here